घरताज्या घडामोडीसरकारवाडा पोलीस चौकी आता सराफ बाजार चौकी

सरकारवाडा पोलीस चौकी आता सराफ बाजार चौकी

Subscribe

ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्याच्या आठवणींना उजाळा

सरकारवाडा पोलीस ठाणे अंकित सरकारवाडा पोलीस चौकीचे नामकरण सराफ बाजार पोलीस चौकी करण्यात आले आहे. अद्ययावत करण्यात आलेल्या सराफ बाजार पोलीस चौकीचे उद्घाटन मंगळवारी (दि.२८) सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तांनी नांगरे-पाटील यांनी पोलीस चौकीची पाहणी करत सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार व कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी ब्रिटीशकालीन सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या आठवणींना उजाळा दिला.

सरकारवाड्यामधील नाशिक महानगरातील ब्रिटीशकालीन पहिल्या पोलीस ठाण्याचे काळानुरूप बदल झाले. नाशिक महानगराचा विस्तार झपाट्याने झाल्याने २००६ मध्ये सरकारवाडा पोलीस ठाणे गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयाशेजारी स्थलांतर झाले असून २०१५ मध्ये पोलिसांच्या ताब्यातील जप्त केलेले साहित्य स्थलांतरित करण्यात आले. सराफ बाजार संवेदनशील ठिकाण असल्याने पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या जागीच सरकारवाडा पोलीस चौकी सुरू ठेवली. मात्र, सरकारवाडयाच्या पाठीमागील बाजूस पोलीस चौकी अद्यावत नसल्याने व जुनीच वास्तू असल्याने सराफ व्यापारी, ग्राहक व नागरिक तक्रारीसाठी कमी प्रमाणात जात होते. नव्या चौकीमुळे सराफ व्यापारी, ग्राहकांना तत्काळ पोलीस मदत उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, पुरातत्त्व विभागाचे उपसंचालिका आरती आळे, सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, नगरसेविका वैशाली भोसले, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती उपस्थित होते.

इतिहासकालीन सरकारवाडा पोलीस चौकीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. चौकीमुळे सराफ बाजार परिसरातील सराफ व्यापारी व ग्राहकांमध्ये सुरक्षेचा वातावरण निर्माण होणार आहे. तक्रारी नागरिकांना पोलीस चौकीत करता येणार आहेत.
पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त

- Advertisement -

नाशिकमधील पहिले सरकारवाडा पोलीस ठाणे असून आता सरकारवाडा पोलीस चौकीचे नामकरण सराफ बाजार पोलीस चौकी असे करण्यात आले आहे. या चौकीत दोन पोलीस अधिकारी व १५ पोलीस कर्मचारी असतील.
हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,सरकारवाडा पोलीस ठाणे

सरकारवाडयामध्ये २००६ पूर्वी सरकारवाडा पोलीस ठाणे कार्यान्वित होते. सराफ बाजार संवेदनशील ठिकाण असल्याने या ठिकाणी अद्यावत पोलीस चौकीबाबत मागणी करण्यात आली होती. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मागणीची दखल घेत पोलीस चौकीचे नुतनीकरण केले आहे. पोलीस चौकीमुळे दागिने खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होणार आहे.
चेतन राजापूरकर, अध्यक्ष, सराफ बाजार असोसिएशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -