Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अविश्वसनीय: पठ्यानं अत्याधुनिक पद्धतीने बंगल्यातच केली गांजाची शेती

अविश्वसनीय: पठ्यानं अत्याधुनिक पद्धतीने बंगल्यातच केली गांजाची शेती

वाईतील बंगल्यात मोठ्या प्रमाणात गांज्याच्या वनस्पती आढळल्या

Related Story

- Advertisement -

सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये एका बंगल्यात गांजाची शेती होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस केली आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती अशी आहे की, गांजाची शेती करणारे दोन तरुण हे परदेशी आहेत. कोणत्याही परवानगीविना हे परदेशी नागरिक वाईच्या या बंगल्यात राहत आहेत. सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु स्ट्रॉबेरीच्या माहेरघर असलेल्या साताऱ्यातील वाईत चक्क घरातच गांजाची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर साताऱ्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे एक पथक या बंगल्यातील तरुणांची चौकशी करण्यास गेले होते. परंतु बंगल्यात गेल्यावर पोलिसांनी गांजाच्या शेती प्रकार बघून हैराण झाले.

साताऱ्यातील वाईमध्ये एका बंगल्यात जर्मनीहून आलेले दोन परदेशी राहत होते. हे दोनी परदेशी कोणत्याही शासकीय परवानगीविना राहत होते. पोलिसांना माहिती मिळाली की, या दोन्ही परदेशींकडे पासपोर्ट आणि इतर दस्तावेज नाही आहेत. या माहितीची खात्री करण्यासाठी डीएसबीचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. याच पोलिसांच्या पथकाने बंगल्यात प्रवेश केला तेव्हा त्यांना बंगल्यात अंमली पदार्थ असल्याचे कळाले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशी आणि तपासात बंगल्यात गांजाची शेती होत असल्याचे उघडकीस आले आहे. बंगल्यात राहणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाईतील बंगल्यात मोठ्या प्रमाणात गांज्याच्या वनस्पती आढळल्या आहेत. तसेच इतर अंमली पदार्थही आढळले आहेत. गांज्याच्या शेतीसह गांजाच्या पुड्या, बिया आणि गांजा वनस्पतीही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. गोव्यातून हे दोन्ही नागरिक वाईत आले आहेत. वाईत आल्यावर या नागरिकांनी बंगला भाड्याने घेतला आणि अत्याधुनिक पद्धतीने बंगल्याच्या तळमजल्यापासून ते टेरेसपर्यंत या पदेशी नागरिकांनी गांजाची शेती केली होती.

अत्याधुनिक पद्धतीने केलेल्या गांजा शेतीच्या तपासणीसाठी पोलिसांच्या विशेष पथकानेही घटनास्थळी पाचारण केले होते. या पथकाच्या उपस्थित जपती आणि पंचनामा केला जात आहे. तसेच या बंगल्याच्या मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा आरोपींनी पळ काढण्याचाही प्रयत्न केला आहे.

- Advertisement -