घरमहाराष्ट्रसाताऱ्यात राजकीय तूफान येण्याची शक्यता, भाजप आमदाराला राष्ट्रवादीत प्रवेशाची खुली ऑफर

साताऱ्यात राजकीय तूफान येण्याची शक्यता, भाजप आमदाराला राष्ट्रवादीत प्रवेशाची खुली ऑफर

Subscribe

कोणत्याही नेत्याशी माझा वैयक्तिक वाद नाही - शशिकांत शिंदे

सातारा जिल्ह्यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची खुल्लमखुल्ला ऑफर दिली आहे. एकेकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये राजकारण पेटलं होते. परंतु राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा असे म्हटले आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी नगरपालिका निवडणुकींपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व करतील रामराजे यांच्या माध्यमातून एकत्र येऊन बिनविरोध निवडणूक करु असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे की, माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी नेहमीच भर दिला आहे. कोरेगाव,जावळी हे दोन्ही तालुके माझ्यासाठी जवळचे आहेत. पक्षाला फायदा होण्यासाठी मला देखील काही काम करणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी विरोध केला जाईल तिथे पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली जाईल असा आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले शशिकांत शिंदे

शिवेंद्रराजेसह इतर नेत्यांशी माझा कुठलाही वाद नाही. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मला काम करावेच लागेल. कोणाला वाईट वाटते म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सोडायची का? असा सवाल शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तर पुढील काही दिवसांत विधानपरिषद डीपीडीसीची निवडणूक लागेल. या निवडणूकीत अनेक जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. तसेच जिल्हा बँकेला जावळी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -