घरताज्या घडामोडीसत्यपाल मलिक यांना सीबीआयचे समन्स, पुलवामा हल्ल्याबाबत केला होता गौप्यस्फोट

सत्यपाल मलिक यांना सीबीआयचे समन्स, पुलवामा हल्ल्याबाबत केला होता गौप्यस्फोट

Subscribe

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. आता या प्रकरणी त्यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आलेले आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. पण आता त्यानंतर मलिक यांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे. आज (ता. २१ एप्रिल) मुंबईतील घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता शिबीर पार पडले. या शिबीरामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुलावामा हल्ल्याच्याबाबत मत व्यक्त केले आणि त्याच्या काही वेळातच सीबीआयकडून सत्यपाल मलिक यांना समन्स बजावण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने सत्यपाल मलिक यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये त्यांना भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे.

हेही वाचा – सरकारच्या निष्काळजीपणामुळे खारघरमधील घटना, शरद पवारांचा आरोप

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय या महिन्यात २७ आणि २८ एप्रिलला सत्यपाल मलिक यांची चौकशी करू शकते. ही चौकशी मलिक यांच्या अकबर रोड येथे असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये होऊ शकते. परंतु, याबाबत सीबीआयकडून अद्यापही कोणतेही अधिकृत वृत्त देण्यात आलेले नाही.

- Advertisement -

 

जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले होते. पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते, असा गौप्यस्फोट द व्हायरल या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सत्यपाल मलिक यांनी केला होता. तसेच, पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र गृहमंत्रालयाने त्यांना विमानं दिली नाही ही चूक केली आणि त्यामुळे 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला, असा खुलासा देखील मलिक यांनी या मुलाखतीमध्ये केला होता. मलिक यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर काँग्रेसने देखील केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

अनेक दिवसांपासून सत्यपाल मलिक हे केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. किसान विधेयकाविरोधात धरणे धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थही ते बोलले होते. त्यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकालाही विरोध केला होता. केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करणे हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असल्याचे ते म्हणाले होते. तर सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -