घरमहाराष्ट्रसुमधुर गायनाने रंगला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा चौथा दिवस

सुमधुर गायनाने रंगला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा चौथा दिवस

Subscribe

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरूवात दत्तात्रय वेलणकर यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी राग 'मुलतानी' सादर केला. तसेच राग 'पटदीप'मधील 'नैया पार करो' ही रचनाही त्यांनी सादर केली.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरूवात दत्तात्रय वेलणकर यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी राग ‘मुलतानी’ सादर केला. तसेच राग ‘पटदीप’मधील ‘नैया पार करो’ ही रचनाही त्यांनी सादर केली. ‘संत भार पंढरीत’ या अभंगाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), सोमजीत लाल व शरत् देसाई (तानपुरा) यांनी साथसंगत केली. त्यांच्यानंतर प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे-साठ्ये यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘मधुवंती’ने सुरूवात करून ‘जागे मोरे भाग’, ‘री नंदलाल घर मोरे आएं’, ‘श्री अंबिका जगदंब भवानी’ अशा सुश्राव्य रचना प्रस्तुत करत रसिकांची दाद मिळवली.

रसिकांचा टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद

सावनी शेंडे-साठ्ये यांनी सादर केलेली पं. भोलानाथ भट यांची रागमाला तसेच शोभा गुर्टू यांचा ‘सैया रूठ गएं मैं मनाती रही’ हा दादरा यांसदेखील रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. त्यांना केदार पंडित (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), प्रीती पंढरपूरकर व अक्षता गोखले (तानपुरा) यांनी साथसंगत केली. त्यानंतर बासरीवादक विवेक सोनार यांनी बासरी वादनातून राग ‘वाचस्पती’ रसिकांसमोर उलगडला. त्यांनी आलाप जोड तसेच मत्त ताल आणि तीन तालातील सुरेल रचना सादर केल्या. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), पं. भवानी शंकर (पखावज) आणि विनय चित्राव (तानपुरा) यांनी साथ दिली. पुण्यामध्ये गेल्या ६५ वर्षांपासून सवाई गंधर्व कार्यक्रम होत आहे. आज या कार्यक्रमाचा चौथा दिवस संपन्न झाला.

- Advertisement -

हेही वाचा – सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या जागेचा वाद मिटला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -