घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात ठाकरे गटाला भगदाड; अखेर १२ नगरसेवक शिंदे गटात सामील

नाशकात ठाकरे गटाला भगदाड; अखेर १२ नगरसेवक शिंदे गटात सामील

Subscribe

नाशिक : नाशिकच्या शिवसेनेच्य बालेकिल्ल्याला अखेर मोठे भगदाड पडले असून उद्धव ठाकरे गटातील तब्बल १६ माजी नगरसेवक गुरुवारी (दि.१५) रात्री ११.३० च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन धडकले. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली हे नगरसेवक मुंबईला गेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर समन्वयक सचिन भोसले यांनीही शिंदे गटात प्रवेश करत नाशिक मनसेला पहिला धक्का दिला.

खासदार राऊतांचे अपयश

नाशिक शहराकडे गेल्या पाच वर्षांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फारसे लक्ष गेले नसले तरी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांचे मात्र सातत्याने नाशिक दौरे सुरू होते. चार महिन्यांपासून त्यांनी या पक्षांतराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने नाशिककडे अधिक लक्ष केंद्रित केले होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकत त्यांनी शिवसैनिकांची मोट बांधून ठेवली होती. मात्र, असे असतानाही माजी नगरसेवकांची अंतर्गत खदखद त्यांना समजू शकली नाही. परिणामी संबंधित माजी नगरसेवक अखेर मुंबईला जाऊन धडकले. तरीही खासदार राऊतांना कानोकानी खबर मिळालेली नव्हती.

- Advertisement -
यांनी केला प्रवेश 

अजय बोरस्ते, सूर्यकांत लवटे, आर.डी. धोंगडे, डि.जी. सूर्यवंशी, शामकुमार साबळे, सुदाम ढेमसे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, पुनम मोगरे, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, प्रताप मेहरोलिया आदीं माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. याच सोबत मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -