Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग, आगीत लाखोंंच नुकसान

पुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग, आगीत लाखोंंच नुकसान

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कोथरुड परिसरातील बिग बास्केट कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाहीत. रात्री साडे अकरा वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अधिक माहितीनुसार, पुण्यातील बावधन परिसरातील बिग बास्केट कंपनीच्या गोडाऊनला ही आग लागली आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास ही आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या जवानांना जवळपास साडे तीन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आगीत बिग बास्केट कंपनीचं संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालं आहे. बिग बास्केट कंपनीकडून जवळपास पाच किलो मीटर परिसरात अनेक दुकानांमध्ये भाजीपाला, किराणा माल आणि इतर साहित्याचा पुरवठा केला जातो. मात्र आगीत सर्व साहित्य जळून खाकं झालं आहे. त्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान झाल आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -