घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत, शंभुराज देसाईंची टीका

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत, शंभुराज देसाईंची टीका

Subscribe

शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढत आहेत. आज आदित्य ठाकरेंनी पाटण आणि कराड येथे निष्ठा यात्रा काढत शिंदे गटावर निशाणा साधला. दरम्यान, आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत

- Advertisement -

शंभुराज देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा आहे. माझे विरोधक, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंच्या सभेला आणण्यात आले होते. ज्या नेत्यांना स्वत:च्या मतदारसंघात थोडी मतं मिळतात ते लोक आज माझ्या मतदारसंघात येऊन मला हरवण्याच्या गोष्टी करत आहेत.

तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना बाजूला ठेवलं

- Advertisement -

आम्ही गद्दार नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. मागील वेळी तुम्हीच आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसवलं होतं. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना बाजूला ठेवलं होतं, अशी टीकाही शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

शिवसैनिकांना अडीच वर्षात काय मिळालं? – एकनाथ शिंदे

शिवसैनिकांना अडीच वर्षात काय मिळालं? तडीपारीची कारवाई तेवढी करण्यात आली. अडीच वर्षात आम्हाला कुणी विचारलं नाही. सामान्य शिवसैनिकाची ही भावना होती. आम्ही उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसायचं का? नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चार नंबरवर फेकली गेली. आम्ही गद्दार, बंडखोर असतो तर तुम्ही एवढ्या उन्हात आला असता का? आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : केवळ दोघांचेच मंत्रिमंडळ असल्यानं तिथच बसून जीआर काढतात, अजितदादांचं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -