घरमहाराष्ट्रपुणेSharad Pawar : एका राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाणार; भाजपावर निशाणा साधताना पवारांचा...

Sharad Pawar : एका राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाणार; भाजपावर निशाणा साधताना पवारांचा दावा

Subscribe

पुणे : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे शरद पवार गट आणखीनच आक्रमक झाला आहे. अशातच आता अजित पवारांबरोबर गेलेल्या दिलीप वळसे पाटलांचा बालेकिल्ला असणाऱ्या आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सभा आज पार पडली. या सभेत शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधताना दावा केला की, आज ना उद्या एका राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाणार आहेत. (Chief Minister of a state will go to jail Sharad Pawars claim while targeting BJP)

हेही वाचा – Sharad Pawar : वळसे पाटलांच्या मतदारसंघात त्यांनाच पाडण्याचे शरद पवारांकडून आवाहन

- Advertisement -

आंबेगाव येथील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची आस्था ही पक्ष फोडणं आणि लोकांना तुरुंगात टाकण्यात आहे. झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल चांगलं राज्य चालवतात, पण पंतप्रधानांना ते आवडत नाही. त्यामुळे केजरीवाल यांच्या दोन चार मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय केजरीवाल यांना ईडीने 16 नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे आज ना उद्या केजरीवाल यांनाही अटक होईल, असा दावा करताना या देशात हे काय चाललंय? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची गॅरंटी, एका बाजूला यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला कोणी ना कोणी शेतकरी आत्महत्या करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्थिती किती दिवस चालू द्यायची. यात बदल करायचा की नाही, ठरवलं तर आपण करू शकतो, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात

जगायची इच्छा मनात असतानाही शेतकरी आत्महत्या करतो

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. अनेक पीकं घेतली जातात, पण त्या पिकांची किंमत शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. कधी कधी शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज एवढं बसतं की, सावकार घरातील भांडीकुंडी घेऊन जातात. अशी वेळ आल्यावर सन्मानाने जगायची इच्छा असलेला शेतकरीही आत्महत्या करतो. हे चित्र फक्त राज्यात नाही तर  देशात आहे, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -