घरताज्या घडामोडीसगळे माझ्यासारखे नसतात, सत्ता गेल्यावर मी मॅच बघायला गेलो - शरद पवार

सगळे माझ्यासारखे नसतात, सत्ता गेल्यावर मी मॅच बघायला गेलो – शरद पवार

Subscribe

सगळे माझ्यासारखे नसतात, सत्ता गेल्यामुळे काही लोकं अस्वस्थ झाले आहेत. मी पुन्हा येणार म्हणणारे येऊ शकले नाही यामुळे अस्वस्थ आहेत असे म्हणत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणीसांवर टोला लगावला आहे. राज्यात सामाजिक तेढ निर्माण करुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कऱण्यासाठी काही लोकं प्रयत्न करत आहेत. परंतु राष्ट्रपती राजवट लागू होईल असे वाटत नाही असे थेट मतही शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. माझी सत्ता गेली तेव्हा मी सरकारी घर खाली करुन वानखेडवर मॅच बघायला गेलो होतो असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातील अस्वस्थ लोकांबाबत भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्यावर लोकं अस्वस्थ होतात. हा काही नवीन भाग नाही. सगळे लोकं माझ्यासारखे नसतात, माझी अनेकवेळा सत्ता गेली. मला आठवत आहे. १९७८ ते ८० साली माझे सरकार बरखास्त केले ही बातमी मला रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी सांगितली. यानंतर काही मित्रांना बोलवले आणि दुसऱ्या घरी राहायला गेलो. सरकारी गाडी सोडली त्या दिवशी इंग्लंड विरुद्ध इंडिया क्रिकेट सामना होता. हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमला गेलो आणि दिवसभर सामना पाहिला असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

- Advertisement -

मी येणार म्हणारे येऊ शकले नसल्याने अस्वस्थ

सत्ता असली काय नसली काय, सत्ता येते जाते त्याच्यामुळे आपण अस्वस्थ होण्याची गरज नाही. हल्ली काही लोकं फार अस्वस्थ आहेत. त्याला दोष देणार नाही. कारण निवडणुका होणार त्यापूर्वीपासून मी येणार..मी येणार असे सांगितले होते पण तसे घडू शकले नाही त्यामुळे अस्वस्थता असते असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू होईल असं वाटत…

अस्वस्थ असणाऱ्या लोक कुठे कुठे मार्ग उपस्थित आहेत. याच्या खोलात जाणार याचा विचार करण्याचे कारण नाही. राष्ट्रपती राजवट अशी चर्चा केली जाते. ही दमदाटी केली जाते परंतु त्याचा काही फायदा होत नाही. निवडणुकीचे निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितले आहे. त्यामुळे लगेच असे काही होईल असे वाटत नसल्याचे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

देशात अनेक राज्यात वीजेची टंचाई

वस्तुस्थिती अशी आहे की, यावेळेला देशातील अनेक राज्यात वीजेची टंचाई आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश अनेक राज्यात वीजेची कमतरता आहे. याला दोन कारणे आहेत एक प्रमाणापेक्षा जास्त मागणी आहे. शेतीमुळेसुद्धा त्याची मागणी वाढली आहे. त्यात काही गोष्टींची कमतरता आहे. यामध्ये आता केंद्र सरकार काय म्हणतंय आणि राज्य सरकार काय म्हणतय यापेक्षा सगळ्यांनी बसून मार्ग काढला पाहिजे. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री बराच वेळ मार्ग काढण्यासाठी देत असतात यामुळे परिस्थिती सुधारत जाते. हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर तसं घडलं तर हळूहळू ही स्थिती बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. परंतु महिना दीड महिन्यापेक्षा हा कालखंड जास्त राहील असे दिसत नाही असे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : धार्मिक भावना प्रत्येकाने स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात, शरद पवारांचा विरोधकांवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -