घरताज्या घडामोडीधार्मिक भावना प्रत्येकाने स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात, शरद पवारांचा विरोधकांवर निशाणा

धार्मिक भावना प्रत्येकाने स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात, शरद पवारांचा विरोधकांवर निशाणा

Subscribe

राज्यात हनुमान चालिसा पठण करण्यावरुन वाद सुरु आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. शिवैसनिकांनी राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी गर्दी केली होती. तसेच घोषणाबाजी केली. यावरुन राज्यात चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा आता यावर प्रतिक्रिया दिली असून विरोधकांवर निशाणा साधला आहे. प्रत्येकाने धार्मक भावना स्वतःपर्यंत मार्यादित ठेवाव्यात, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुढील काळात हा प्रकार कमी होईल अशी आशा असल्याचे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, एखाद्या धर्माबाबत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. त्या भावना त्याने अंतकरणात ठेवाव्यात आपल्या घरात ठेवाव्यात आपण त्याचे प्रदर्शन करायला लागलो आहे. त्याच्यामुळे अन्य घटकांसंबधी असे जर प्रयत्न केले तरी त्यातून दुष्परिणाम समाजात दिसायला लागतात. महाराष्ट्रात हे कधीही नव्हते परंतु आता महाराष्ट्रात या गोष्टी दिसायला लागल्या आहेत. माझ्यासारख्याला पाहून आश्चर्य वाटतं , मी अनेक वर्ष राज्यात काम केले. बाळासाहेब ठाकरेंचे आणि माझे जाहीर एवढे मतभेद असायचे परंतु शब्द एकमेकांविरोधात वापरण्याची काटकसर दोघांनी केली नाही. परंतु बैठक संपल्यानंतर ते माझ्या घरी किंवा मी त्यांच्या घरी जात होतो असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

माझ्या दारापाशी येऊन धार्मिक कार्यक्रम करत असाल तर..

मुख्यमंत्री म्हणजे केवळ उद्धव ठाकरे बघत नाही तर ही एक संस्था आहे. या संस्थांचे एक वकूब हा ठेवला पाहिजे. ते न ठेवण्याची काही लोकं भूमिका घेत आहेत. तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल परंतु जर तो कार्यक्रम माझ्या दारापाशी येऊन करत असाल तर माझ्याबद्दल अस्था असलेल्या सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता झाली तर त्याला दोष देता येणार नाही. म्हणून या पद्धतीची भूमिका अलिकडे काही लोकं मांडत आहेत. परंतु हे आणखी काही दिवसांत हे कमी होईल अशी आशा आपण करु. माझ्यासारख्याची अशी भूमिका असेल की, या प्रकारचा विद्वेश न वाढावा आणि पुन्हा राज्याची परिस्थिती पूर्वपदावर यावी असे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यात स्पेशल टीम पाठवावी, किरीट सोमय्यांची मागणी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -