घरमहाराष्ट्रईडीच्या कारवायांनी महाविकास आघाडी अस्थिर नव्हे तर भक्कम होतेय - शरद पवार

ईडीच्या कारवायांनी महाविकास आघाडी अस्थिर नव्हे तर भक्कम होतेय – शरद पवार

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचे ससेमीरा लागला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य करताना ईडीच्या कारवायांनी महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर भक्कम होत आहे, असं प्रतिपादन केलं. तसंच, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला. तसंच, आम्ही १०० टक्के हे सरकार चालवणार आणि पुन्हा कसं सत्तेवर येईल हे देखील बघणार, असं शरद पवार म्हणाले. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्याविरोधात ईडीच्या केसेस सुरू आहेत, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आली आहे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात केस आहे, भावना गवळींवर आरोप झालेत, तिथेही छापे मारण्यात आले आहेत, त्यामुळे सरकार अस्थिर होईल असं वाटतं का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना अजिबात सरकार अस्थिर होणार नाही. उलट यामुळे सरकार आणखी भक्कम व्हायला लागलं आहे, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

ईडीच्या कारवायांमुळे सरकारमध्ये एकसंघत्व यायला लागलं आहे. कुणी आपल्याला टार्गेट करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण एक झालं पाहिजे ही भावना आता निर्माण झाली आहे. ही सगळी प्रकरणं राजकीय आकसाने केली जातात. तेच या प्रकरणांमध्ये आपल्याला दिसतंय, असं शरद पवार म्हणाले.


हेही वाचा – काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशच्या जमीनदारासारखी – शरद पवार

- Advertisement -

हा मला गैरवापर वाटतो

ईडीचा गैरवापर होत असल्याचं तुम्ही म्हणताय, पण भाजपचे लोक आमच्याकडे पुरावे आहेत, असं म्हणतात. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी असलेल्या अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांच्या विरोधात पत्र लिहिलं, गंभीर आरोप करतात, त्याबद्दल काय? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. यावर पवार यांनी बोलताना तोच पोलीस अधिकारी आज का पुढे येत नाही? असा सवाल शरद पवार यांनी केला.

पॉईंट असा आहे की बेजबाबदारपणा करणाऱ्या एखाद्याने एखादी गोष्ट केली किंवा आरोप केला तर त्याच्याकडे स्पष्टीकरण मागितलं गेलं पाहिजे. त्याऐवजी केंद्र सरकार अधिकारी काय म्हणतोय कुणावर आरोप करतोय त्यालाच बाहेर काढू पाहतं आहे. हा मला गैरवापर वाटतो, असं पवार म्हणाले.


हेही वाचा – काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच डल्ला मारला; नाना पटोलेंचा पवारांवर पलटवार

शरद पवारांनी काँग्रेसचं करेक्ट वर्णन केलंय; फडणवीसांचा खोचक शब्दात निशाणा


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -