“जो शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला असंच उत्तर मिळणार” तानाजी सावंतांच्या पुण्यातील कार्यालयात शिवसैनिकांकडून तोडफोड

तानाजी सावंत यांचे हे कार्यालय पुण्यातील बालाजीनगर या ठिकाणी आहे. ही तोडफोड ज्यावेळी करण्यात आली तेव्हा पोलिस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. हातात शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली

सध्या संपूर्ण भारताचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींकडे लागून राहिलेले आहे. शिवसेना नेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. याचं बंडखोरीमुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेले आमदार तानाजी सावंत यांच्या पुणे येथील कार्यालायाची तोडफोड करण्यात आली आहे. तानाजी सावंत यांनी केलेल्या बंडखोरीमुळे पुण्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

तानाजी सावंत यांचे हे कार्यालय पुण्यातील बालाजीनगर या ठिकाणी आहे. ही तोडफोड ज्यावेळी करण्यात आली तेव्हा पोलिस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. हातात शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. याशिवाय कार्यालयाच्या काचांवर गद्दार असे देखील लिहिण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

तसेच यावेळी शिवसैनिक म्हणाले की, ‘जो शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला असंच उत्तर मिळणार. बंड करणाऱ्यांना अजूनही वेळ आहे. त्यांनी लगेच परत यावे, अन्यथा त्या सर्वांची अशीच अवस्था होईल’. तसेच शिवसैनिक असं देखील म्हणाले की, ‘सत्ता असताना शिवसेनेत आहे. मात्र तो मूळ शिवसैनिक नाही. सुरुवात आता पुण्यातून झाली आहे, हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पेटेल. त्यामुळे बंडखोरांनी वेळीच परत यावे’. याशिवाय तानाजी सावंत यांच्या जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.