घरमहाराष्ट्रमनसेचे नगरसेवक वसंत मोरेंना शिवसेनेची खुली ऑफर, ‘मातोश्री’वर येण्याचं निमंत्रण, सेनेच्या नेत्यांचा...

मनसेचे नगरसेवक वसंत मोरेंना शिवसेनेची खुली ऑफर, ‘मातोश्री’वर येण्याचं निमंत्रण, सेनेच्या नेत्यांचा फोन

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफर आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना नेते आदित्य शिरोडकर यांनी वसंत मोरे यांना फोन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलवलं असल्याचं समजतं. यावर वसंत मोरे यांनी मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरेंशी भेट घेऊन निर्णय घेईन असं म्हटलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफर आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना नेते आदित्य शिरोडकर यांनी वसंत मोरे यांना फोन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलवलं असल्याचं समजतं. यावर वसंत मोरे यांनी मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरेंशी भेट घेऊन निर्णय घेईन असं म्हटलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वसंत मोरे बोलत होते. त्यामुळं येत्या महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे वसंत मोरेंच्या रुपात धक्का बसण्याची शक्यता आहे. तसंच, वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करणार का? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा त्या समोर भोंगे लावून मोठ्या आवाजाता हनुमान चालीसा वाजवू”, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मनसेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मशिदींसमोर भोंगे लावत मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवत होते. मात्र, वसंत मोरे यांनी भोंगे लावण्यास नकार दिला होता. त्यांच्या या विरोधानंतर त्यांची पुण्याच्या शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तसंच नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.

- Advertisement -

पुण्याचे शहराध्यक्ष या पदावरून काढल्यानंतर वसंत मोरे मनसे पक्ष सोडणार का? अशा चर्चांना उधाण आलं. तसंच, अनेक पक्षांनी त्यांना फोन केल्याचं समोर आलं. अशातच आता वसंत मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेटायला बोलवलं असल्याचं समजतं. वरुण सरदेसाई, आदित्य शिरोडकरांचा वसंत मोरे यांना फोन आल्याची माहिती आहे.

याबाबत वसंत मोरे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ‘मी राजसाहेबांची भेट घेऊन आणि त्यानंतर निर्णय घेईन’, असं म्हटलं. तसंच, ‘माझी हकालपट्टी झालेली नाही. शेवटी पक्षात खांदेपालट होत असतात. माझ्यावरील कारवाईआधी मीच राज ठाकरेंना सांगितलं होतं की, मे नंतर मला शहराध्यक्षपदावर राहायचं नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. सरतेशेवटी पक्षाने निर्णय घेतला आहे. मी राजसाहेबांचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. राजसाहेबांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. त्यांच्यासोबत गेली २७ वर्ष मी काम करतोय. साहेब माझ्या हृदयात असतील. सध्यातरी मनसे सोडण्याचा माझा विचार नाही’ असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Petrol Diesel Price: इंधनाच्या किमती आजही स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -