घरमहाराष्ट्रनाहीतर राजकीय गांजाड्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचा लाड यांना इशारा

नाहीतर राजकीय गांजाड्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचा लाड यांना इशारा

Subscribe

वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं वक्तव्य करणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. राज्यात नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फूटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांचं नाव न घेता दिला आहे.

संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी प्रसाद लाड यांचं नाव न घेता थेट इशारा दिला आहे. “महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है.) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?” असं ट्विट संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

नितेश राणे गांजा पिऊन बोलतो

शिवसेना भवन हे कलेक्शन भवन झालंय, असं वादग्रस्त भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. काही माणसं गांजा पिऊन बोलतात, त्यांच्याकडे कुठं लक्ष द्यायचं, असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -