घरताज्या घडामोडीsanjay raut : केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा कोणाच्या मागे?, संजय राऊतांनी वाचला...

sanjay raut : केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा कोणाच्या मागे?, संजय राऊतांनी वाचला पाढा

Subscribe

भाजपकडून रोज नव्या तारखा दिल्या जात आहे. महाराष्ट्रात १७० चे बहुमत असताना भाजपकडून नव्या तारखा दिल्याजात आहे. कोणाच्या भरोशावर तारखा देत आहेत ? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनातून भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राऊतांनी भाजपचे केंद्रीय यंत्रणेंशी असलेले कनेक्शनच बाहेर काढले असून शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली याची माहिती दिली आहे. ही कारवाई सरकार पाडण्यासाठी करण्यात आली असल्याचा खुलासा यावेळी त्यांनी केला आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांनी आपली महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी घेतली होती. परंतु आपण त्यांना नकार दिल्यानंतर माझ्या नातेवाईकांच्या घरी पहाटे केंद्रीय यंत्रणांची पथके गेली असा आरोप संजय राऊत यांनी केली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरसुद्धा संजय राऊतांनी घणाघाती हल्ला केला आहे. केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा कोणावर लावण्यात आला याचा राऊतांनी पाढाच वाचला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय यंत्रणांचा बोगसपणा जाहीर केला आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे परिवार, आनंदराव अडसूळ, रविंद्र वायकर, शिवसैनिक, अनिल परब, भावना गवळी, महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करत आहेत. हे महाराष्ट्र नव्हे तर देशावर संकट आहे. महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडायचे आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकून एकतर तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू अशा प्रकारच्या घोषणा सतत दिल्या जातात. भाजपकडून रोज नव्या तारखा दिल्या जात आहे. महाराष्ट्रात १७० चे बहुमत असताना भाजपकडून नव्या तारखा दिल्याजात आहे. कोणाच्या भरोशावर तारखा देत आहेत ? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

उपराष्ट्रपतींना पत्र लिहिल्यामुळे भाजपची आगपाखड

उपराष्ट्रपती व्यैंकेया नायडू यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणा काय करतात आणि एका राज्यसभा सदस्याला कशाप्रकारे त्रास देऊ पाहत आहे. याचे कारण एवढेच आहे. की साधारण २० दिवसांपूर्वी आणि त्या पूर्वी काही भाजपचे प्रमुख लोकं भेटले त्यांना मी ओळखतो, ते ३ वेळा भेटले आणि त्यांनी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की, या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा आमची संपूर्ण तयारी झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करू नाहीतर आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना आम्ही सरकारकमधून तोडू असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच जर तुम्ही आमच्यासोबत आला नाही तर केंद्रीय तपास यंत्रणाकडून टाईट करु दिल्लीतून सगळी तयारी झाली आहे. तुम्हाला टाईट कऱण्याची असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. यावर आपण काही हरकत नाही असे सांगितले असल्याचे संजय राऊत म्हणाले.

दुसऱ्याच दिवशी पवार कुटुंबीयांवर तपास यंत्रणेंच्या धाडी

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या याबाबतही राऊतांनी सांगितले आहे. भाजपच्या नेत्यांसोबत काय संवाद झाला याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. राऊत म्हणाले, पाहिले असेल सध्या पवार कुटुंबीयांवर धाडी पडत आहेत. ते प्रकरण सोप नाही पण त्यांनासुद्धा टाईट करु असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले असल्याचे राऊत म्हणाले. त्यानंतर पवार कुटुंबीयांवर सातत्याने धाडी पडू लागल्या , त्यांच्या मुली आणि बहिणींच्या घरात अधिकारी घुसले ८ दिवस बाहेर पडत नव्हते. तेव्हा आम्ही प्रतिकार करु , सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात ठिणगी पाडू, आम्ही केंद्रीय पोलीस दल आणू आणि तुम्हाला थंड पाडू असे सांगण्यात आले यांनी तिसऱ्याच दिवशी माझ्या संबंधातील लोकांवर धाडी पाडण्यात आल्या असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : sanjay raut press conference : मुंबई पोलीस कोणाची काळजी घेत आहेत ? नागरिकांची कि सत्ताधाऱ्यांची ? भाजपचा सवाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -