घरमहाराष्ट्ररावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार? मोदींना सवाल

रावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार? मोदींना सवाल

Subscribe

रावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा सवाल शिवसेनेकडून मोदींना करण्यात आला आहे.

श्रीलंकेत भीषण बॉमबस्फोट झाले असले तरी भारताला त्याचे हादरे बसले आहेत. शेजारधर्म तर आहेच, पण लंकेशी आपले धार्मिक आणि भावनिक संबंधदेखील आहेत. सरकारी आकडा काहीही असला तरी कोलंबोतील बॉम्बस्फोट मालिकेत पाचशेहून जास्त निरपराध्यांचा बळी गेला आहे. लिट्टेच्या दहशतवादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी दहशतवादाचा बळी ठरला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलेंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा सवाल उपस्थित करतानाच भारतातही बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

‘नकाब बंदी’ करावी

श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत आणि पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब बंदी’ करावी,अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

तिहेरी तलाक आणि बुरखा बंदीविरोधात कोणी आवाज उठवला तर इस्लाम संकटात आल्याची बांग मारली जाते. खरे म्हणजे मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही. मुसलमानांत कोणी फुले किंवा शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू आणि अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले आहे. धर्मांधता आणि त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

बुरख्यांचा वापर करून देशद्रोह घडवला जातो

बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर असून बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही. भारतातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करत आहेत. अरबस्तानातील वाळवंट आणि उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली. राज्यातही पारा चढतो त्यावेळी तरुणी चेहर्‍यास ओढणी किंवा रुमाल गुंडाळूनच बाहेर पडतात. हे तेवढ्यापुरतेच असते. मात्र ‘नकाब’ किंवा ‘बुरखा’ घालणे हा जणू कुराणाचा आदेश आहे, अशा भ्रमात किंवा अंधश्रद्धेत येथील मुसलमान वावरत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -