घरमहाराष्ट्रघटनात्मक पेचप्रसंग राज्यपाल आणि त्यांचे बोलविते धनी निर्माण करतायत; राऊतांचा पलटवार

घटनात्मक पेचप्रसंग राज्यपाल आणि त्यांचे बोलविते धनी निर्माण करतायत; राऊतांचा पलटवार

Subscribe

मी घटनेनुसारच काम करतो असं राज्य सरकारला प्रत्युत्तर देणाऱ्या राज्यपाल भतसिंह कोश्यारी यांना शिवेसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पलटवार केला. घटनात्मक पेचप्रसंग हा राजभवनात निर्माण झाला असून राज्यपाल आणि त्यांचे बोलविते धनी हा पेचप्रसंग निर्माण करतायत, असा पलटवार राऊत यांनी केला. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्यांवरुन संजय राऊत यांनी हा निशाणा साधला आहे. शुक्रवारी ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

राज्यपाल यांच्यावर दबाव आहे की नाही माहिती नाही. पण राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या काही महिने रखडल्या आहेत, त्यासंदर्भात ते बोलले असते तर बरं झालं असतं. त्यासंदर्भात त्यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे? बारा जागा विधीमंडळातल्या रिकाम्या ठेवून तुम्ही महाराष्ट्रावर, आमदारांवर आणि विधीमंडळावर अन्याय करताय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

- Advertisement -

राज्यपालांच्या दौऱ्याला पालकमंत्री उपस्थित राहत नाहीत, हा अपमान आहे असं वाटत नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले. ज्याचं ते काम आहे ते करावं. राज्यपालांचं काम आहे राजभवनातून सरकारच्या कामाची माहिती घेणं, सरकारला सूचना करणं, चांगलं मार्गदर्शन करणं, सरकार घटनेच्या चौकटीत राहून काम करतं की नाही हे पाहणं आणि मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय आणि केलेल्या शिफारसी मान्य करणं हे माझ्या माहितीप्रमाणे राज्यपालांच काम आहे, असं म्हणत राऊत यांनी राज्यपालांना त्यांच्या कामाची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला.

घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतो तेव्हा राज्यपालांचं मुख्य काम असतं. महाराष्ट्रात कोणताही घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला नाही आहे. घटनात्मक पेचप्रसंग राजभवनातच निर्माण झालेला आहे. बारा आमदारांच्या नियुक्त्या या घटनेनुसार वेळेत करणं गरजेचं आहे. मंत्रिमंडळाने शिफारस केलेली आहे. तरी राज्यपाल घटनेच्या चौकटीत त्या शिफारशींना मान्यता द्यायला तयार नसतील तर घटनात्मक पेचप्रसंग राज्यपाल आणि त्यांचा बोलवता धनी हेच निर्माण करतायत, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -