घरमहाराष्ट्रशरद पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले...

शरद पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांणा उधाण आलं असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शन केलं असेल. त्या भेटीकडे राजकीय हेतुने पाहणं चुकीचं आहे, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी टोला देखील लगावला. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष राज्यात गोंधळ घालतोय, त्यावरुन पुढील १०० वर्ष विरोधकांची सत्ता येणार नाही, असा सल्ला पवारांनी दिला असावा, असा उपरोधीक टोला देखील राऊतांनी लगावला.

“विरोधी पक्षाने महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करणं गरजेचं आहे, असं मार्गदर्शन शरद पवारांनी फडणवीसांना केलं असेल. या राज्याला विरोधी पक्षांची मोठी परंपरा आहे. शरद पवार हे देखील विरोधी पक्षनेते होते. त्यांनी विधीमंडळात विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे फडणवीस जर पवारांकडे गेले असतील तर नक्कीच मार्गदर्शन केलं असेल. शरद पवारांची तब्येत किंचित बरी नाही आहे, त्यामुळे ही सदिच्छा भेट असावी. महाराष्ट्रात आपली परंपरा आहे. आपण इतर राज्यांप्रमाणे राजकारणात शत्रुत्व घेऊन बसत नाही. जाणं येणं सुरु असतं, त्यामुळे त्या भेटीकडे एक राजकीय हेतुने बघू नये,” असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

शरद पवारांनी फडणवीसांनी सत्तेचा मंत्र दिला असेल का यावर बोलताना संजय राऊत यांनी उपरोधीकपणे टोला लगावला. “सत्तेचा मंत्र नक्कीच दिला असेल. सत्तेचा मंत्र अशाप्रकारे दिला असेल कदाचीत, ज्या प्रकारे विरोधी पक्ष राज्यात गोंधळ निर्माण करतोय, सरकारच्या कामात अडथळे निर्माण करतोय…असंच जर विरोधी पक्ष करत राहिले, तर पुढील १०० वर्षे विरोधकांची सत्ता येणार नाही, असा सल्ला शरद पवारांनी नक्कीच देवेंद्र फडणवीस यांना दिला असणार,” असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -