घरमहाराष्ट्रराणे-राऊत एकाच मंचावर; कोकणात शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे ‘मनोमिलन?

राणे-राऊत एकाच मंचावर; कोकणात शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे ‘मनोमिलन?

Subscribe

कोकणात शिवसेना आणि राणे कुटुंब यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. सेना आणि राणे यांच्यातील राजकीय कलगीतुरा रंगलेला नेहमी सर्वजण पाहत आले आहेत. परंतु, रविवारी मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगुर्ले तालुक्यात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वेंगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि भाजपचे आमदार नितेश राणे एकाच मंचावर दिसले. त्यामुळे नितेश राणेंनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवलीय का? मंत्रिपद मिळाल्यानंतर राणे कुटुंबियांमध्ये नरमाई आलीय का? कोकणात शिवसेना-भाजप नेत्यांचे ‘मनोमिलन’ झालेय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

रविवारी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वेंगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळे भाजपचे आमदार नितेश राणे, आमदार रविंद्र चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार आणि सचिव विनायक राऊत आणि शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर एकाच मंचावर आले होते. यावेळी राऊत आणि नितेश राणे यांच्यात खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं. नितेश राणे आणि विनायक राऊत हे एकमेकांच्या कानात हितगुज करताना पहायला मिळाले. नितेश राणेंनी तर जाहीर भाषणातून सेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केलं. हल्ली युतीची चर्चा बंद होती पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल, या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की रंगेल. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू असं वेगळं राजकीय संकेत नितेश राणेंनी दिले.

- Advertisement -

राऊतांनी नितेश राणेंची थोपटली पाठ

नितेश राणे आपलं भाषण संपवून खुर्चीवर बसताच विनायक राऊतांनी त्यांची पाठ थोपटली. नितेश राणेंनी बोलून दाखवलेली एकत्र येण्याची भाषा संपत नाही. तोपर्यंत विनायक राऊतांनी देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावर केला. आपण आणि नितेश राणे मित्र असून अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं, असं म्हणत विनायक राऊतांनी कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात याची झलक दाखवली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -