घरमहाराष्ट्र'पाकिस्तान विरोधात शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक करायला हवा' 

‘पाकिस्तान विरोधात शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक करायला हवा’ 

Subscribe

शिवजयंती निमित्त कल्याण शिवसेनेतर्फे निघणाऱ्या मिरवणुकीत शिवसेना रामबाग शाखेने 'पाकिस्तान विरुद्ध शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक हवा' अशी मागणी करत शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचा देखावा साकारला आहे.

शिवजयंती निमित्त कल्याण शिवसेनेतर्फे निघणाऱ्या मिरवणुकीत शिवसेना रामबाग शाखेने ‘पाकिस्तान विरुद्ध शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक हवा’ अशी मागणी करत शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचा देखावा साकारला आहे. या देखाव्याने आचारसंहितेचा भंग होईल, अशी भीती व्यक्त करीत महात्मा फुले पोलीस स्टेशनने विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांच्याविरुद्ध नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

कल्याण-डोंबिवलीत शिवजयंतीची मिरवणूक

पुलवामा हल्ल्यातील ४० जवानांना श्रद्धांजली वाहताना पाकिस्तान विरुद्ध एयर स्ट्राईक करण्याऐवजी शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक करायला हवा. स्वराज्यात दहशदवाद करणाऱ्या शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपतींनी लाल महालात घुसून शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाचीही हिमंत झाली नव्हती. म्हणूनच दहशतवाद्याचे आश्रयस्थान असणाऱ्या पाकिस्तानशी आरपारचे युद्ध करून जगाच्या नकाशावरून पाकड्यांचे नाव नष्ट करून टाकावे, असा देखावा मिरवणूकीत साकरण्यात आला होता. सालाबादप्रमाणे कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेतर्फे यंदाही  तिथीनुसार शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकेत तारपा नृत्य, ढोल पथक, लेझिम पथक, मिरवणुकीत नारायणगाव येथील घोडे यांनी अश्व नृत्य सादर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -