घरमहाराष्ट्रधक्कादायक! सलाइनमध्ये सापडलं शेवाळं! पुण्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ

धक्कादायक! सलाइनमध्ये सापडलं शेवाळं! पुण्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ

Subscribe

हा प्रकार निष्काळजीपणा आणि दुर्लक्षपणाचा कळस असल्याने संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना संपुर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास अहोरात्र झटत आहे. मात्र अशा परिस्थितीत पुण्यातून हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका सलाइनच्या सीलबंद बाटलीत शेवाळं आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असताना पुण्यात मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका खासगी रुग्णलयात हा प्रकार घडला आहे. हा प्रकार निष्काळजीपणा आणि दुर्लक्षपणाचा कळस असल्याने संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. सलाइनच्या सीलबंद बाटलीत शेवाळं आढळल्याने ही सलाइनची बाटली बरीच जुनी असावी. त्यामुळे यामध्ये शेवाळ तयार झालं. पण इतक्या जुन्या सलाइनच्या बाटल्या कंपनीतून रुग्णालयात पोहोचल्याच कशा? या बाटल्यांची तपासणी का केली गेली नाही? असे अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहेत. तसेच, डॉक्टरांनी स्वत:च हा धक्कादायक प्रकार समोर आणला असून आलेल्या सर्व सलाइनच्या बाटल्यांचा वापर थांबवला आहे.


कोरोना काही जाईना चला, त्याच्याबरोबरच जगायची आता तयारी करूयात!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -