घरताज्या घडामोडीमहिलांबाबत ठाकरे सरकारची निवडक लोकांवरच कारवाई, श्वेता महालेंचा आरोप

महिलांबाबत ठाकरे सरकारची निवडक लोकांवरच कारवाई, श्वेता महालेंचा आरोप

Subscribe

मेहबूब शेख बाबतीत आपण पाहिले असेल ती महिला वारंवार तक्रार करत होती परंतु त्याची दखल अद्याप प्रशासनाने घेतलेली नाही. माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याबद्दल दखल घेतली नाही. जेव्हा भाजप रस्त्यावर उतरली तेव्हा त्या महिलेला न्याय मिळाला. ठाकरे सरकारने निवडक पध्दतीचे राजकारण सुरू केलेले आहे ते थांबले पाहिजे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी टीका केली असून नवा वाद सुरू झाला आहे. या वादात आता भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी उडी घेतली आहे. आमदार श्वेता महाले यांनी या प्रकरणावरुन थेट ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार महिलंसंदर्भात निवडक कारवाई करत आहे, हे कुठे तरी थांबले पाहिजे, असे श्वेता महाले म्हणाल्या आहेत.

भाजप आमदार श्वेता महाले यांनी म्हटलं आहे की, रश्मी ठाकरे यांच्याबद्दल कोणी चुकीचे शब्द काढत असतील तर आम्ही महिला म्हणून नक्कीच समर्थन करणार नाही. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल कोणी चुकीचे शब्द काढत असतील तर त्याचेही समर्थन आम्ही करणार नाही. रश्मी ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्या तक्रारीची सरकार लगेच दखल घेते परंतु त्याचवेळेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल विद्या चव्हाण अतिशय खालच्या थराला जाऊन टीका करतात. तो शब्द देखील मला उच्चारावासा वाटत नाही. परंतु त्याची दखल शासन ठाकरे सरकार घेत नाही हे दुर्दैवी असल्याचे श्वेता महाले म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

मेहबूब शेख बाबतीत आपण पाहिले असेल ती महिला वारंवार तक्रार करत होती परंतु त्याची दखल अद्याप प्रशासनाने घेतलेली नाही. माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याबद्दल दखल घेतली नाही. जेव्हा भाजप रस्त्यावर उतरली तेव्हा त्या महिलेला न्याय मिळाला. ठाकरे सरकारने निवडक पध्दतीचे राजकारण सुरू केलेले आहे ते थांबले पाहिजे. सर्व महिला सारख्याच आहेत, त्यांना ठाकरे सरकारने समान वागणूक दिली पाहिजे. आज सर्व महिला मुख्यमंत्र्यांकडे बघत आहेत. असे श्वेता महाले म्हणाल्या.

नेमका वाद काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र भाजपच्या आयटी सेलचा प्रभारी जितेन गजारिया यांचा विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला. हा निषेध करत असताना विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांना या वादात ओढले. अमृता फडणवीस यांचा डान्सिंग डॉल असा उल्लेख विद्या चव्हाण यांनी केला. यावर अमृता फडणवीस यांनी कमालीचा संपात व्यक्त केला. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्या घरातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणत शाब्दिक हल्ला चढवला.

- Advertisement -

अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत लिहिले की, ‘आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण,आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानीची नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!’ असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले. यात अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाणांना थेट कायदेशीर नोटीस बजावत मानहानीचा दावा केला आहे. विद्या चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा कोर्टातच करावा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा : आशिष शेलारांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, गुन्हे शाखेची धडक कारवाई

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -