घरताज्या घडामोडीसिंधूदुर्गातील रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या कोरोनावरील 'मिथिलीन ब्यू' औषधास मान्यता

सिंधूदुर्गातील रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या कोरोनावरील ‘मिथिलीन ब्यू’ औषधास मान्यता

Subscribe

कोविडची दुसरी लाट भारतात फारच जीवघेणी ठरली. बेडस् आणि ऑक्सिजनची कमतरता, प्रचंड महाग औषधे, कोविड विषाणूवरच्या संशोधनाबद्दल अपुरी माहिती आणि व्हॅक्सीनचा अपुरासाठा यामुळे कित्येक लोक मृत्युमुखी पडले. दुसऱ्या लाटेमध्ये जास्त मृत्यू हे तरुण वर्गातील झाले. भारतासह जगातील कित्येक गरीब देश अशा एका औषधाच्या शोधात होते की जे स्वस्त असेल, सहजपणे उपलब्ध असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याचे दुष्परिणाम नगण्य असतील. गुजरात येथील शास्त्रज्ञ डॉ. दिपक गोळवलकर ह्यांनी भारतात पहिल्यांदा मिथीलीन ब्ल्यू ह्या औषधाचा उपयोग सौम्य आणि पहिल्या स्टेजवरच्या कोविड रुग्णांसाठी सर्वप्रथम केला. एम. डी. डॉ. च्या भारतातील दोनशे डॉक्टरांनी एक ‘संशोधन ग्रुप’ स्थापन करुन त्याचा उपयोग आपल्या पेशंटसाठी सुरू केला.

सदर उपचार पद्धतीचा उपयोग कोरोना टाळण्यासाठीच झालाच. शिवाय ए.आर.डी.एस. न्युमोनिया झालेल्या बऱ्याच पेशंटना सलाईन मधून हे औषध दिल्याने त्यांचे प्राण वाचले गेले. बऱ्याच व्हेंटिलेटर वरच्या पेशंटचे व्हेंटीलेटर बंद करुन त्यांना फक्त ऑक्सिजनवर जगवता आले. ऑक्सिजनची गरज जवळ-जवळ निम्याने कमी झाली. उदाहरणा दाखल मालवण येथील रुग्णालयात सदर उपचार पद्धतीमुळे गेल्या नव्वद दिवसामध्ये एकही कोविडबाधित रुग्णालाचा मृत्यू झाला नाही. यामध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी तीस रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. मिथीलीन ब्ल्यू उपचार पद्धतीचा Government protocol मध्ये समावेश करण्यासाठी डॉ.दीपक गोलवलवकर, गुजरात यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची, तर सदरच्या संशोधनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. विवेक रेडकर यांनी महाराष्ट्र राज्यातील आरोग्यमंत्र्यांची याबाबत भेट घेतली होती. त्यांनी आश्वासन दिले आणि ‘टास्क फोर्स कडे’ बोट दाखवत  ‘Emergency Use Permission’साठी आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर मालवण, गोवा आणि दिनानाथ मंगेशकर, पुणे हॉस्पिटलने I. C. U. तील अतीगंभीर रुग्णांवर Methelene Blue चा उपयोग केला. तो फार मोठया प्रमाणात यशस्वी झाला. त्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय जनरलने याबद्दल व्यापक प्रसिध्दी दिली. ‘मिथिलीन ब्ल्यु’चा वापर आणि उपयोगाबद्दल आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याची आवश्यकता होती. डॉ. विवेक रेडकर यांनी यासंदर्भात केलेले संशोधन आता अमेरिकेत स्वीकृत झाल्याने हे सुध्दा आता साध्य झाले आहे. सन १९०३ साली औषध वापर आणि संशोधनासाठी स्थापन झालेली, अमेरिकेतील ‘अमेरिकन सोसायटी ऑफ टॉपिकल मेडिसिन आणि हायजिन सोसायटी यांनी ‘मिथिलीन ब्ल्यु’सदर औषधास मान्यता दिली आहे. सदरची संस्था क्रिटिकल केयर फोरम मधील जगातील पियर रिव्ह्यू रिसर्चला मान्यता देणारी जगातील पहिल्या तीन विश्वासू संस्था पैकी एक आहे.

महाराष्ट्रातील लसीकरण आणि आजारामुळे आलेल्या हर्ड इम्युनिटीमुळे सुदैवाने तिसरी लाट आणि मृत्युदर अत्यंत कमी झाले. तरी देखील ब्लडप्रेशर, मधुमेह विकार, ज्येष्ठ नागरिक तसेच कोमॉरबीड पेशंटमध्ये ही लाट चालूच आहे. त्यामुळे मिथिलीन ब्ल्यु या औषधाचा उपयोग, लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड होऊ नये म्हणून चालू ठेवणे आवश्यक आहे. ऑक्सिजनच्या हयुमिडीफायर मध्ये हे औषध मिसळल्याने म्युकर मायकोसिसची साथही आटोक्यात आली आहे.

- Advertisement -

कोविड पेशंटच्या रक्तातील ‘मिथ हिमोग्लोबीन’ किती असते. त्यामुळे Oxygen ची पातळी कमी होते ह्याचे संशोधन देखील कृष्णा मेडीकल कॉलेजच्या बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट मध्ये चालू आहे. डॉ. अजित सोनटक्के आणि डॉ. विवेक रेडकर त्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. ही पातळी कळल्यास ह्या औषधाला टास्क फोर्सच्या मान्यतेची गरज भासणार नाही. त्यावरही गेलॉर्ड, अमेरिका येथे होणाऱ्या कॉन्फरन्समध्ये मालवण आणि कृष्णा मेडिकल कॉलेज येथे ट्रीटमेंट घेतलेल्या पेशंटवरील हा संशोधन प्रबंध डॉ. विवेक रेडकर यांनी ३० ऑक्टोबर रोजी दृक्श्राव्य माध्यमातून सादर केला. संबधित प्रबंध लवकरच ASTMH  या जगप्रसिद्ध वैद्यकीय जनरल मधून जगभरात प्रसिध्द होईल.

सदरच्या संशोधनाला मदत करणारे डॉ. गोलवलकर, डॉ. शिंदे, डॉ. सोनटक्के, डॉ. इनामदार, डॉ. सागर रेडकर, कृष्णा मेडिकल I. C. U Covid Department चे डॉ. अपर्णा पतंगे RHRC चे डॉ दर्शन खानोलकर, डॉ. मोहन जगताप आणि RHRC स्टाफचे आभार डॉ. विवेक रेडकर यांनी मानले आहेत. तसेच सिंधुदुर्गात हजारो लोकांपर्यंत मिथिलीन ब्ल्यु औषधाचा वापर, त्याचा उपयोग याबद्दल जनजागृती करणारे आणि त्यांच्या पर्यंत पोचवणारे मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्ता सामंत, अंगणवाडी सेविका साठी काम करणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमल परुळेकर आणि मुंबई च्या माजी महापौर डॉ.शुभा राऊळ यांचे पण आभार मानले आहेत.

भारतातील सुमारे दोनशे तज्ञ डॉक्टरने सुचविलेले आणि रेडकर हॉस्पिटलमध्ये रिसर्च सेंटर ने संशोधित मिथिलीन ब्ल्यु उपचार पद्धतीसंबंधित संशोधन प्रबंधाला “अमेरिकन टॉपिकल मेडीसीन ॲन्ड हायजिन शास्त्रज्ञांची मान्यता मिळाल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी भारतातही त्याचा वापर अधिकृत करण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार काय पाऊल उचलले याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -