घरक्रीडाT20 world cup 2021: राहुल द्रविडच्या रुपात सांघिक नेतृत्वाचा प्रशिक्षक मिळालाय, संघाची...

T20 world cup 2021: राहुल द्रविडच्या रुपात सांघिक नेतृत्वाचा प्रशिक्षक मिळालाय, संघाची कामगिरी उंचावण्याचा रवी शास्त्रींचा विश्वास

Subscribe

राहुल द्रविडच्या रूपात सांघिक नेतृत्वाचा प्रशिक्षक मिळालाय आणि द्रविडला एका चांगल्या संघाचा वारसा असल्याचे सांगत द्रविड संघाची कामगिरी आणखी उंचावेल असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला

टी-२० विश्वचषकात सोमवारी भारतीय संघ आपला शेवटचा सामना खेळत आहे. रवी शास्त्रींचा प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळातील भारतीय संघाचा हा शेवटचा सामना आहे. अशातच सोमवारच्या सामन्यापूर्वी रवी शास्त्री यांनी त्यांच्या क्रिकेटच्या कार्यकाळाबाबत भाष्य केले. त्यांनी सांगितले की, ‘माझ्या कार्यकाळात जगातील सर्वात ‘बेस्ट टिम’ तयार झाली आहे. त्या संघाने प्रत्येक संघाला त्यांच्या घरी जाऊन पराभूत केले.’ रवी शास्त्री यांचा भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ सध्या सुरू असलेल्या विश्वचषकानंतर संपणार आहे. तर शास्त्रीनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा कारभार राहुल द्रविड सांभाळणार आहे. राहुल द्रविडच्या रुपात सांघिक नेतृत्वाचा प्रशिक्षक मिळालाय आणि द्रविडला एका चांगल्या संघाचा वारसा असल्याचे सांगत द्रविड भारतीय संघाची कामगिरी आणखी उंचावेल असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.

रवी शास्त्री यांनी आपल्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळाबाबत सांगितले की, “हा प्रवास माझ्यासाठी खूप चांगला राहिला. जेव्हा मी ही जबाबदारी घेतली होती तेव्हा ठरवले होते संघात बदल करायचा आहे आणि कदाचित तो बदल झाला आहे. कधी-कधी आयुष्यात याला महत्त्व नसते की आपण काय कमावले, तर हे देखील महत्त्वाचे आहे की आपण कुठून आलो आहे. मागील पाच वर्षात भारतीय संघाने जे काही मिळवले ते शानदार आहे”.

- Advertisement -

“भारतीय संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारात चांगली कामगिरी केली आहे आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून भारतीय संघाची ओळख झाली आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली. कसोटी सामन्यात जगभरात जाऊन विजय मिळवला ते आमच्यासाठी सर्वात खास आहे. आम्ही प्रत्येक संघाचा पराभव केला आहे आणि मुख्य म्हणजे क्रिकेटच्या तीनही प्रकारात पराभव केला आहे. खास म्हणजे प्रत्येक संघाचा त्यांच्या घरात जाऊन पराभव केला आहे,” असे शास्त्रींनी आणखी बोलताना सांगितले.

रवी शास्त्री यांनी २०१७ नंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कारभार सांभाळला होता. तेव्हापासून आतापर्यंत विराट कोहली आणि शास्त्री या जोडीच्या नेतृत्वात भारतीय संघ कामगिरी करत आला आहे. रवी शास्त्रींच्या कार्यकाळात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये देखील कसोटी मालिका जिंकल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे शास्त्रींच्या नेतृत्वात भारतीय संघ कोणताच आयसीसीचा किताब जिंकू शकला नाही.

- Advertisement -

हे ही वाचा :Hockey : अत्यंत बिकट परिस्थितीतून केली होती सुरूवात; आता हॉकीच्या ‘राणी’ ला मिळाला पद्मश्री


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -