घरमहाराष्ट्र"अंतरवाली सराटीतील लाठीचार्जची SIT चौकशी करावी", विजय वडेट्टीवारांची मागणी

“अंतरवाली सराटीतील लाठीचार्जची SIT चौकशी करावी”, विजय वडेट्टीवारांची मागणी

Subscribe

अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज करण्याचे आदेश कोण दिले हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शोधायला पाहिजे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कल्याणच्या सभेतून केली आहे.

मुंबई : जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अंतरवालीतील लाठीचार्ज कोणी केला होता, हे मनोज जरांगे पाटील किंवा सरकार पाहून घेतली. पण तो लाठीचार्ज हा दुर्दैवी होता, असे मतही विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

अंतरवाली सराटीतील लाठीचार्जसंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, “जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला, तो दुर्दैवीच होता. यानंतर पोलिसांना झालेली मारहाण ती देखील अमानुष होती. यात अनेक महिला आणि पोलिसांनाही छरे लागले, अशा घटना सरकार टाळू शकले असते. हे राज्य सरकारचे फेल्युअर आहे, असे मानतो किंवा सरकारने हे जाणून भुजून केले असेल, असे माझे मत आहे. यासंदर्भात चौकशी झाला पाहिजे. आम्ही अधिवेशनात अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जच्या स्पेशल एआयटी नेमणूक किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी करू”, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – “गरज पडल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस पाडू”, मुख्यमंत्र्यांची वाढत्या प्रदूषणावर प्रतिक्रिया

 

- Advertisement -

राज्याच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले नाही, मग…

अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज करण्याचे आदेश कोण दिले हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शोधायला पाहिजे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कल्याणच्या सभेतून केली आहे. तसेच जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक पदी बढती करण्यात आली आहे, यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. लाठीचार्जचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले नसल्याचे माहित्या अधिकारातून समोर आले आहे, या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “जर राज्याच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिला नाही. मग सरकारच्या शक्तीचा गैरवापर करणारे कोण आहे. त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो की, तुम्ही त्या व्यक्तीला शोधून काढा.”

हेही वाचा – आता बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, चित्रा वाघ यांनी विरोधकांना सुनावले

लाठीचार्जचे बक्षीस दिले असेल, मला माहिती नाही. मी माहिती घेतो. जनतेवर निष्पाप लोकावर कटरचून हल्ला केला. त्यांना जर बडती मिळणार असेल मी त्याची माहिती घेतली नाही. यासंदर्भात माहिती घेऊन बोलेण, तुषार दोशींवर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. या प्रकरणातून कोणालाच सुट्टी मिळणार नाही. तुषार दोशींना आजचे समाधान असेल पण त्यांना यातून सुट्टी मिळणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -