घरमहाराष्ट्र"गरज पडल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस पाडू", मुख्यमंत्र्यांची वाढत्या प्रदूषणावर प्रतिक्रिया

“गरज पडल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस पाडू”, मुख्यमंत्र्यांची वाढत्या प्रदूषणावर प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : दिल्ली पाठोपाठ आता मुंबईची हवा देखील काही दिवसांपासून प्रदूषित झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महनगर पालिकेच्या वतीने काही उपयोजना आखल्या जात आहे. मुंबईतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी गरज वाटल्यास कृत्रिम पाऊस पाडू आणि यासाठी दुबईतील कंपनीशी करार करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पहाटे पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन सबवे, टर्नर रोड, जॉगर्स पार्क आदी परिसरास भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. यावेळ मुख्यमंत्र्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.

मुंबईच्या वाढत्या प्रदूषणावर मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर म्हणाले, “रस्त्यांवरील धूळ तसेच हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी दिवसाआड पाणी फवारणी करण्याच्या त्याचप्रमाणे वॉटर फॉगर, जेटींग मशिन, सक्शन मशिन, स्मॉग गन, आदींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत जिथे विकासकामे सुरू आहेत. त्या ठिकाणीनेचे ही विकासकामे सुरू असलेले ठिकाणे कवर करण्यासाठी सांगितले आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रोचे काम मोठ्याप्रमाणात सुरू आहे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. यासाठी गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे, यासाठी दुबईतील एका कंपनीशी करार करण्यात येणार आहे. मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात झाडे लावण्यात येणार असून अर्बन फॉरेस्ट करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – भारतीय क्रिकेटचे नेतृत्व भाजपाच्या ‘वंशवादा’कडे… ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल

एक हजार टॅकर भाड्याने घेऊ

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मुंबईतील प्रदूषणाचे वाढते प्रमाण करण्याच्या सूचना पालिका कर्मचाऱ्यांना दिल्या आहे. मुंबईतील रस्ते पाण्याने धुवावेत जेणे करून डस्ट पूर्ण काढावी हे हवेतील धुलीकन फॉगरने कमी करावेत. यासाठी सक्शन मशीन आपण लावलेली असून 1 हजार टॅकर भाड्याने घेऊन मुंबईतील रस्ते आणि फुटपाथ पाण्याने धुतले जात आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा – आता बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, चित्रा वाघ यांनी विरोधकांना सुनावले

मुंबईतील बीच स्वच्छ करण्यासाठी एक टीम तैनात

“मुंबईतील रस्ते हे एक दिवसाआड पाण्याने धुतले तर बऱ्यापैकी प्रदूषण कमी होईल आणि कचराही रोज उचलाल जात आहे. स्वच्छतेवर आम्ही भर देत असून रस्ते, फुटपाथ आणि नाल्यांची स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, त्याचबरोबर मुंबईतील बीच स्वच्छ करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात येणार असून सार्वजनिक शौचालय दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छ केले जातील”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी ‘या’ ठिकाणी केली पाहाणी

प्रारंभी डी विभागामध्ये पेडर रोड येथे दुभाजक स्वच्छता कामाची पाहणी करून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. एच पूर्व विभागामध्ये कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भूयारी मार्ग परिसर; के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल आणि त्यानंतर एच पश्चिम विभागामध्ये जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग आदी ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी रस्ते, पदपथ स्वच्छता तसेच धूळ प्रतिबंधक कामांची पाहणी केली. दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रस्ता स्थित जॉगर्स पार्क येथे भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -