घरताज्या घडामोडीशिवजयंतीच्या दिवशीच गडाखालचे अख्ख हॉटेल लुटल, गरीब हॉटेल व्यावसायिकाची मावळ्यांना भावनिक fb...

शिवजयंतीच्या दिवशीच गडाखालचे अख्ख हॉटेल लुटल, गरीब हॉटेल व्यावसायिकाची मावळ्यांना भावनिक fb पोस्ट

Subscribe

सातारा जिल्ह्यात वसंतगड हा एतिहासिक असा एक किल्ला आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज आणि कऱ्हाड दरम्यान हा रस्ता आहे. वसंतगडच्या पायथ्याशी तळबीड हे गाव आहे. तळबीळ गावात एक हॉटेल चालवणाऱ्या प्रकाश साळुंखे नावाच्या व्यक्तीने नुकताच शिवजयंतीच्या निमित्ताने आलेला कटू अनुभव फेसबुकवर व्यक्त केला आहे. वसंतगडावर आलेल्या काही मावळ्यांकडून हॉटेलमध्ये झालेल्या नासधुशीच्या प्रकाराकडे त्याने आपल्या फेसबुकच्या पोस्टमधून व्यक्त केले आहे. असे प्रकार गडावर येणाऱ्यांकडून वारंवार होत असल्याचेही त्याने आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे. तसेच ही माहिती देतानाच प्रकाश साळुंखे यांनी गडावर येणाऱ्या मावळ्यांना एक विनंती आणि आवाहनदेखील केले आहे.

प्रकाश साळुंखे हे गेल्या २३ वर्षांपासून वसंतगड तळबीड येथे हॉटेलचा व्यवसाय करतात. त्यांच्याआधी हा व्यवसाय त्यांच्या वडिलांनी सुरू केला होता. त्यानंतर पिढीजात व्यवसायाची जबाबदारी प्रकाश साळुंखे यांनी घेतली. पण हॉटेल चालवताना वारंवार येणाऱ्या नुकसानाचा अनुभव त्यांनी फेसबुकवर मांडला आहे. नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या निमित्तानेही त्यांना असाच काहीसा अनुभव आला. या अनुभवानंतर त्यांनी गडावर येणाऱ्या मावळ्यांनाही विनंती केली आहे. असा प्रकार वारंवार होत असल्याने त्यांनी म्हटले आहे की, मी नम्र विनंती करतो की, तुम्ही दुसरीकडे कुठे गेलात तर असे गरीबांचे नुकसान करू नका. अशी वाईट करण्याची शिकवण ही माझ्या महाराजांची असूच शकत नाही, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून नमुद केले आहे.

- Advertisement -

काय आहे फेसबुक पोस्ट ?

माझे नाव प्रकाश साळुंखे गेली २३ वर्ष माझे वसंतगड तळबीड या किल्ल्यावर हॉटेल आहे माझे वडील गेल्यानंतर मी तो वारसा पुढे चालवत आहे पण परवा किल्ल्यावर ज्योत प्रज्वलित करण्यासाठी काही मावळे आले होते पण माझी तब्बेत बरी नसल्याने माझे हॉटेल बंद होते त्याचा गैरफायदा घेऊन माझ्या हॉटेल मधील बिसलेरी पाणी बॉक्स व खाण्याच्या वस्तू लंपास केल्या.मी फार मोठा व्यवसाय करणारा नाही आणि त्या छोट्या हॉटेल वर माझे पूर्ण कुटुंब अवलंबून आहे.वारंवार असे घडत आहे.माझी त्यांना नम्र विनंती आहे तुम्ही दुसरीकडे कुठे गेलात तर असे कोणत्याही गरिबांचे नुकसान नका करू कारण असे वाईट करण्याची शिकवण माझ्या राजांची असूच शकत नाही हे मात्र नक्की!

माझे नाव प्रकाश साळुंखे गेली २३ वर्ष म्हणजे माझ्या वडिलांच्या निधनानंतर आताहे मी चालवत असलेले आमच्या वसंतगड तळबीड या…

Posted by Prakash Salunkhe on Friday, February 19, 2021

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -