घरठाणे... तर आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिरच उभारावे - नरेश म्हस्के

… तर आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिरच उभारावे – नरेश म्हस्के

Subscribe

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी निशाणा साधत, त्यांच्याकडून औरंगजेबाचे उद्दातीकरण होणे आयोग्य आहे. त्यातही आव्हाडांना जर तसेच वाटत असेल तर त्यांनी औरंगजेबाचे एक मंदीरच बनवावे. तसेच त्या मंदिराच्या उदघाटन सोहळ्याला विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बोलवावे. असा टोला त्यांनी लगावला आहे.

 अजित पवारांनी माफी मागावी यासाठी भाजपकडून आंदोलन उभे केले जात आहे. तर अजित पवारांनी माफी का मागावी असा सवाल उपस्थित करीत आव्हाडांनी पलटवार केला आहे. त्यानंतर माजी महापौर म्हस्के यांनी  आव्हाडांना लक्ष्य करत टोला लगावला आहे. आव्हाड यांच्यासाठी वेगळा इतिहास कोणी लिहीला असेल तर माहित नाही, ते आपल्या सोयींने इतिहास मांडत असतात असेही ते म्हणाले. औरंगजेबाला हिंदू धर्माचा तिरस्कार होता, संभाजी राजांचे आतोनात हाल करत त्यांची हत्या औरंगजेबाने केली. संभाजी राजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली मग त्यांना धर्मवीर म्हणायचे नाही का? असा सवालही त्यांनी आव्हाड यांना केला.
याचदरम्यान म्हस्के यांनी खासदार संजय राऊत यांचाही समाचार घेत, ते ज्या दिवसापासून जेल मधून सुटले त्या दिवसापासून त्यांनी वायफळ गप्पा मारण्याचे काम सुरू केले आहे. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, माझ्या प्रभागात मनोरुग्णालय असून कदाचित तेथे त्यांना काही दिवसात आणावे लागेल असा टोला त्यांनी लगावला.
नागपूर अधिवेशनला गेले आणि म्हणाले आम्ही अस करणार तस करणार परंतु एक म्हण आहे , खोदा पहाड निकला संजय राऊत अशी परिस्तिथी असल्याची खिल्लीही त्यांनी उडवली. धर्मवीर म्हणायचं नाही अशा वक्तव्यावर निषेध पण व्यक्त करत नाही याचा अर्थ आम्ही अस म्हणायचं का संजय राऊत आणि ही मंडळी राष्ट्रवादी ची धुणीभांडी करतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी हे पाहावे उरलेले जे काही आमदार खासदार आहेत जे नगरसेवक आहेत त्यातील आपल्याकडे किती राहणार आहेत, येत्या काही दिवसात कळेल किती आमदार किती खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे राहतात हे ही दिसून येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -