घरमहाराष्ट्रडिसले गुरुजींवर आरोप करणारे शिक्षणाधिकारी अडचणीत; झेडपीने केली 'ही' कारवाई

डिसले गुरुजींवर आरोप करणारे शिक्षणाधिकारी अडचणीत; झेडपीने केली ‘ही’ कारवाई

Subscribe

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले गुरुजींवर आरोप करत चर्चेत आलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. किरण लोहार यांना 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोहारांवर लाच घेताना ही कारवाई केली. किरण लोहार यांच्यासह एका लिपिकालाही अटक करण्यात आली. 50 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 25 हजारांची लाच स्वीकारताना लोहार दिसले. यानंतर लाच प्रकरणात अटक केल्यानंतर लोहार यांना आणखी एक धक्का देण्यात आला आहे. (solapur zp primary education officer kiran lohar workload suspended gave to sanjay javr after arrested for bribe of 25 thousand)

लोहार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव शिक्षण खात्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. यानंतर अधिकारी दिलीप स्वामी यांनी किरण लोहार यांचा पदभार काढून घेतला आहे. आता लोहार यांच्याजागी उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर युनिटने 25 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली आहे. लोहार यांच्या कृत्यामुळे शिक्षण खात्याची बदनामी झाली. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली, किरण लोहार यांच्यावर कारवाईसाठी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेला 10 वी पर्यंत मान्यता देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी मागितली होती, यावेळी तडजोडी अंती 25 हजार रुपये ठरले. 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास 25 हजार रुपये घेताना शिक्षण अधिकारी लोहार एसीबीच्या जाळ्यात अडकले. यानंतर दुपारी किरण लोहार यांनी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांनी 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


महाराष्ट्राची जनता शिंदे गटाला आपली घरं दाखवतील, अरविंद सावंतांचा हल्लाबोल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -