घरमहाराष्ट्रST Workers Strike : एसटीचे 1144 कर्मचारी बडतर्फ, तर 55000 कर्मचाऱ्यांना कारणे...

ST Workers Strike : एसटीचे 1144 कर्मचारी बडतर्फ, तर 55000 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Subscribe

एसटी महामंडळाने जवळपास 55 हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर आत्तापर्यंत तब्बल 1144 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तसेच 11 हजार 24 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ST Workers : गेल्या अडीच महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरु आहे. मात्र अनेकदा आदेश देऊन कर्मचारी कामावर हजर न झाल्याने महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामंडळाने वेतनवाढ केल्यानंतरही अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत. अशा कर्मचाऱ्यांविरोधात आता एसटी महामंडळाने कारवाई करत राज्यातील वाहतूक व्यवस्था रुळावर आणण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात महामंडळाने आत्तापर्यंत 1 हजार 144 कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली. तर 55 हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईनंतर आता महामंडळाने निवृत्त चालकांना करारपद्धतीने नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर एसटी महामंडळ सेवानिवृत्त आणि स्वेच्छनिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घेत आहे. याचे एक जाहीरपत्रही महामंडळाने प्रसिद्ध केले आहे. या जाहिरातीनुसार, ६२ वर्षे होण्यासाठी किमान सहा महिने आणि त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असलेल्या निवृत्त चालकांना नोकरीत संधी दिली जाईल. तसेच करारपद्धतीने या कर्मचाऱ्यांची नेमणूक करत त्यांना दरमहा २६ हजार रुपयांचे मानधन निश्चित केले आहे. त्यामुळे इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले, त्या विभागांत करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकतील. येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केलेय. मात्र यात इच्छुक उमेदवारांवर एसटी महामंडळाच्या सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची नोंद नसणे आणि शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेली नसावी अशी अटही घालण्यात आली आहे.

- Advertisement -

55 हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

एसटी महामंडळाने जवळपास 55 हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर आत्तापर्यंत तब्बल 1144 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तसेच 11 हजार 24 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या 55 हजार कर्मचाऱ्यांना संप काळातील पगार मिळणार नसल्याचे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


Jammu Kashmir: पुलवामात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -