घरमहाराष्ट्रमुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे टँकरधारकांना आवाहन

मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे टँकरधारकांना आवाहन

Subscribe

मुंबई : मुंबईत ठिकठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरनी पाणीपुरवठा थांबविल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. या टँकरधारकांनी पाणीपुरवठा तत्काळ सुरt करावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी टँकर असोसिएशनला केले. यासंदर्भात आज, सोमवारी मंत्रालयात आयोजित बैठकीदरम्यान त्यांनी टँकर असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

शासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईतील टँकर्सनी अचानक लोकांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. अशा पद्धतीने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची गैरसोय करणे योग्य नाही. या टँकरधारकांशी त्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यास शासन कधीही तयार आहे. त्यामुळे टँकरधारकांनी लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरु करावा, असे आवाहन लोढा यांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेत केले. मंगळवारी सकाळी मंत्रालयात बैठक घेऊन मुंबईतील टँकरधारकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करू. पण तत्पूर्वी टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरू करावा, असेही लोढा म्हणाले.

- Advertisement -

पाणी टँकर संघटनेने आपल्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर लोढा यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशीही यासंदर्भात दूरध्वनीवरुन चर्चा करून लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरू होण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

- Advertisement -

विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे आधीच मुंबईकर त्रस्त
ट्रॉम्बे उच्च स्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने 8 आणि 9 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तर, त्याआधी मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत 30 जानेवारी रोजी भांडुप संकुल संबंधित जलवाहिनी बदलणे, गळती दुरुस्तीची मोठी कामे हाती घेण्यात आल्याने मुंबईच्या काही भागांत 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

हेही वाचा – निवडणुकीच्या तोंडावर साक्षात्कार का? अशोक चव्हाण यांचा फडणवीसांना सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -