घरमहाराष्ट्रनिवडणुकीच्या तोंडावर साक्षात्कार का? अशोक चव्हाण यांचा फडणवीसांना सवाल

निवडणुकीच्या तोंडावर साक्षात्कार का? अशोक चव्हाण यांचा फडणवीसांना सवाल

Subscribe

अशोक चव्हाण म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते मातब्बर राजकीय नेते आहेत. कोणतीही भूमिका ते खुलेआम घेतात. ते कधीही चुकीचे वागणार नाहीत. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. तशी त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द आहे. 

पुणेः अजित पवार यांच्या सोबत झालेला शपथविधी शरद पवार यांना माहिती होता, याचा साक्षात्कार देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या तोंडावर कसा होतो, असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते मातब्बर राजकीय नेते आहेत. कोणतीही भूमिका ते खुलेआम घेतात. ते कधीही चुकीचे वागणार नाहीत. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. तशी त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द आहे. त्यामुळे फडणवीस यांना आताच या गोष्टीचा साक्षात्कार का झाला असा प्रश्न आम्हा सर्वांनाच पडला आहे.

- Advertisement -

अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमच्याकडे ऑफर आली, की आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. म्हणून आपण सत्ता स्थापन करुया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय घेतला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, जी चर्चा झाली होती ती शरद पवार यांच्याशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही.

शरद पवारांशी चर्चा झाल्यावर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितलं तर मी सांगीन. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा शिवसेनेने मोठा धोका दिला. कारण ते आमच्या सोबत होते, असे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार यांनी फडणवीसांनी केलेला दावा फेटाळून लावला. फडणवीस हे असत्याच्या जोरावर असे वक्तव्य करतील असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. याला भाजपचे प्रदेशाध्दक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. फडणवीस हे कधीच असत्य बोलणार नाहीत. त्यांनी सत्ता सोडली, पण सत्याची साथ सोडली नाही, असे बावनुकळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -