घरमहाराष्ट्रधमकीनंतर महापौर आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण; गृहमंत्र्यांची माहिती

धमकीनंतर महापौर आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण; गृहमंत्र्यांची माहिती

Subscribe

धमकीच्या पत्रानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात आलं आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. तसंच, पत्र लिहिणाऱ्याचा शोध सुरु आहे. जे दोषी सापडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं देखील वळसे पाटलांनी सांगितलं.

“मुंबईच्या महापौरांना जे अर्वाच्च भाषेमध्ये पत्र पाठवलं आणि त्यांना जी धमकी दिलेली आहे. त्याची सरकारने नोंद घेतली आहे. यासंदर्भात महापौर आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात आलं आहे. जे पत्र पाठवलं त्याचा शोध घेत आहोत. जे दोषी सापडतील त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल,” असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

- Advertisement -

धमकी प्रकरणी भायखळा पोलिसात तक्रार

धमकीच्या पत्राची महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर विषयाबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिलं. सदर पत्रावर विजेंद्र म्हात्रे, असे नाव नमूद करण्यात आले आहे. मागील दोन-तीन दिवसातील घडामोडींचा विचार करता आणि प्राप्त पत्रातील मजकूर लक्षात घेता सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी, गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांना दिलेल्या पत्रात नमूद केली होती. तसेच मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्वरित विशेष पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मी या पत्राद्वारे विनंती करीत आहे, असे महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केले होतं.


हेही वाचा – महापौर आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; भायखळा पोलिसात तक्रार

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -