घरट्रेंडिंगखिडक्या उघडा अन् एसी टाळा, राज्य सरकारच्या अत्यंत तातडीच्या सूचना

खिडक्या उघडा अन् एसी टाळा, राज्य सरकारच्या अत्यंत तातडीच्या सूचना

Subscribe

राज्यात कोव्हिड १९ म्हणजे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत (वातानुकुलित यंत्रणांचा वापर कमी कऱण्याबाबत) राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर करून या सूचना जाहीर केल्या आहेत. या विषाणुचा आजार व प्रसार मुख्यत्वे खोकल्यातून किंवा शिंकण्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातूनच मोठ्या प्रमाणात होत आहे. वातानुकुलित यंत्रणांचा कमित कमी वापर किंवा गरजेपुरता वापर करावा अशी प्रतिबंधात्मक सूचना राज्य सरकारने केली आहे. अत्यंत तातडीची सूचना म्हणून सर्वच शासकीय कार्यालये तसेच सेंट्रलाईज एसी वापरकर्ते, घरगुती एसी वापरकर्ते यांच्यासाठी ही सूचना जाहीर करण्यात आली आहे.

GR
शक्यतो एसीचा वापर टाळा असा शासन निर्णय़ जाहीर झाला आहे

करोना विषाणुचे शिंकण्या व खोकल्यातून उडालेले थेंब हवेतील धुलीकणांसोबत विविध वस्तुंच्या पृष्ठभागावर स्थिरावतात. मध्यवर्ती (सेंट्रलाईज) वातानुकुलन किंवा वातानुकुलित खोलीमध्ये असे विषाणुमिश्रीत थेंबातील विषाणु जास्त कालावधीकरिता जिवंत राहतात. परंतु योग्य वायुविजन (वेंटीलेशन) किंवा तापमान जास्त असलेल्या वातावरणात हे थेंब लवकर सुकल्याने या विषाणुचा जीवन कालावधी कमी होतो. व रोग प्रसारणास प्रतिबंध कमी होता. म्हणूनच राज्यातील सर्व कार्यालयात वातानुकुलित यंत्रणा न वापरण्याच्या किंवा गरजेपुरता कमीत कमी वापर करण्याच्या सूचना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या नावे हा शासन निर्णय जारी झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -