घरताज्या घडामोडी'या' चित्रपटावर बंदी घालावी; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

‘या’ चित्रपटावर बंदी घालावी; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

Subscribe

रजा अकादमी संस्थेच्या आक्षेपानंतर राज्य सरकारने त्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.

रजा अकादमी संस्थेने डिजिटल ‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी राज्याच्या सायबर विभागाकडे तक्रार अर्ज केला आहे. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार चित्रपट प्रसारणावर बंदी घालावी, असे पत्र राज्य सरकारने केंद्र शासनास पाठवले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

पत्राद्वारे करण्यात आली मागणी

‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाचे प्रसारण २१ जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. परंतु, त्यावर बंदी घालावी असे विनंतीपत्र रजा अकादमी संस्थेने राज्याच्या सायबर विभागास पाठविले होते. त्यास अनुसरुन केंद्रीय electronics and information technology विभागाला पत्र पाठवून या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारणावर बंदी घालवी. त्याचप्रमाणे यु ट्यूब, फेसबुक. ट्विटर, इन्स्टाग्राम, whatsapp, टेलिग्राम आणि स्नॅपटचॅट यासारखा डिजिटल प्लॅटफॉर्म्सला सदर चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी पत्रात केली आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता हे बंदी घालण्यासाठीचे विनंतीपत्र दिले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रेल्वेचा रोबो देणार जेवण, अन् औषधांचा डोसही!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -