घरमहाराष्ट्रवैद्यकीय शाखेतील प्रवेश सुरु होणार, मराठा समाजाच्या विद्यार्थांसाठी घेतला 'हा' निर्णय

वैद्यकीय शाखेतील प्रवेश सुरु होणार, मराठा समाजाच्या विद्यार्थांसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Subscribe

राज्यातील मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली असताना वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरु करणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, मराठा समाजाच्या विद्यार्थांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वैद्यकीय शाखेतील मराठा विद्यार्थांच्या फीचा भार सरकार उचलणार आहे, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अशातच वैद्यकीय शाखेतील प्रवेश सुरु होणार आहेत. या निर्णयासोबत राज्यातील मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शाखेतील फीचा भार आता राज्य सरकार उचलणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहत वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया सरु करण्यात येणार असल्याचंही अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

ठाकरे सरकारच्या मागील कॅबिनेट बैठकीतही यासंबंधित चर्चा झाली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष होते. आरक्षणाचा प्रश्न अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहायला लावणे योग्य नाही. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. अशातच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठच वैद्यकीय विभागानेही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, प्रवेश प्रक्रिया सुरु केल्यानंतर आरक्षणामुळे मराठा विद्यार्थ्यांना अतिरिक्त फीमध्ये दिलासा मिळणार होता. परंतु, मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे या फीचा भार राज्य सरकार उचलणार आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -