घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपत्रकारांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे व्हावे; अण्णा हजारे यांची मागणी

पत्रकारांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे व्हावे; अण्णा हजारे यांची मागणी

Subscribe

नाशिक : लोकशाहीचा चौथा स्तंभ जर सुरक्षित असेल तरच लोकशाही सुरक्षित राहील. पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने विधीमंडळ तसेच संसदेत कठोर कायदे संमत करुण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. राळेगण सिद्धी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर यांचे वतीने समाजातील विविध गुणवंतांचा सन्मान,पत्रकारांना रेनकोटवाटप व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे बोलत होते.

यावेळी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डॉ.विश्वासराव आरोटे यांचे अध्यक्षतेखाली सर्व पत्रकार बांधवांना रेनकोट, ओळखपत्र व एक वृक्षभेट देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन,राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते,राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व शिवसंवाद न्यूजचे संपादक गाडगे उपस्थित होते. यावेळी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, डॉ.विश्वासराव आरोटे,दत्ता पाचपुते व दत्ता गाडगे आदी मान्यवरांचे उपस्थितीमधे प्राथमिक शिक्षक आनंदा झरेकर, तुकाराम आडसुळ, पीएसआय तुषार ढवण, लोकशाहीर दत्ता करंदीकर, नूतन चौधरी मुंबई पोलीस, लोककलावंत मनिषा चव्हाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, बुके देउन सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

अण्णा हजारे म्हणाले, राज्यातील ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पत्रकारांवर हल्ले होत आहेत. झोपलेल्या सरकारला हे कधी कळणार? लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आल्यामुळे लोकशाहीवरच हा हल्ला असून, सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पहायला हवे. यासाठी राज्य व केंद्र सरकारने विधीमंडळ आणी संसदेत पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कठोर कायद्याची निर्मीती करावी. याप्रसंगी राज्य मराठी पत्रकार संघाचे श्रीगोंदा तालुका तालुकाध्यक्ष शिंदे, सचिव पिटर, सुरेश खोसेपाटील, रामदास नरड, अविनाश भांबरे, संतोष कोरडे, संतोष तांबे, सागर आतकर, महेश शिंगोटे,पत्रकार वसंत रांधवन, संपत कपाळे, गंगा धावडे, आनंदा भुकन, संपत वैरागर, संदीप गाडे, अनिल चौधरी, भगवान मंदिलकर, नितीन परंडवाल,सचिन जाधव आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -