घरमहाराष्ट्रसमलैंगिक, अलैंगिक संबंध कोण सिद्ध करणार?, जनावरं येऊन सांगणार काय?; मुनगंटीवारांचा पारा...

समलैंगिक, अलैंगिक संबंध कोण सिद्ध करणार?, जनावरं येऊन सांगणार काय?; मुनगंटीवारांचा पारा चढला

Subscribe

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी २८ डिसेंबर रोजी सूप वाजले. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचं शेवटचं सत्र विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन चांगलंच गाजलं. या विधेयकावर चर्चा करताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यापीठाचे सीनेट सदस्य कोण हो शकतातच्या नियमावरुन राज्य सरकारला धारेवर धरलं. समलैंगिक, अलैंगिक आणि आंतरलिंगी संबंध असणाऱ्या सदस्याला सिनेटवर घेण्याचा नियम करण्यात आला आहे. एखादा व्यक्ती समलैंगिक, आंतरलिंगी आणि अलैंगिक संबंध ठेवणारा आहे हे कोण सिद्ध करणार? या व्यक्तीने माझ्याशी अलैंगिक संबंध ठेवले असं सर्टिफिकेट जनावरे देणार आहेत काय? असा संतप्त सवाल मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला विचारला.

विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. यावरुन जोरदार घमासान झालं. सुधीर मुनगंटीवार यांनी तर विधेयकांची आणि संबंधित मंत्र्यांना धारेवर धरलं. विद्यापीठाचा सिनेट सदस्य कोण होऊ शकतो? याबाबतचे नवे नियम या विधेयकात देण्यात आले आहेत. समलिंगी संबंध असणारी स्त्री, समलिंगी संबंध असणारा पुरुष यांना सिनेट सदस्य करता येईल. उभयलिंगी संबंध असणारा पुरुष याला सदस्य करता येईल. तृतीय पंथी, समलिंगी संबंधाचे आकर्षण असणारा पुरुष, आंतरलिंगी, अलैंगिक आणि इतरांना सदस्य करण्याची तरतूद सरकारने केली आहे. अध्यक्ष महाराज, पण व्यक्ती समलैंगिक, उभयलिंगी, आंतरलिंगी आणि अलैंगिक आहे हे कोण सिद्ध करणार? तुम्ही सिद्ध करणार आहात? सर्टिफाईड कोण करणार आहे? व्हाईस चान्सलर? व्हाईस चान्सलर नियुक्ती करताना असं लिहून देणार आहेत का की, याला समलिंगी संभोगाचे आकर्षण आहे. तुमच्यापैकी कोण अधिकारी सिद्ध करणार आहे? कोण सिद्ध करणार अध्यक्ष महाराज? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

- Advertisement -

समलैंगिक ठरवणार कोण? यावरुन मुनगंटीवार यांनी जोरदार हल्ला चढवला. मला समलैंगिक संबंध ठेवण्याचे आकर्षण आहे असं कोणी व्यक्ती लिहून देईल काय? कोण सिद्ध करणार आहे सचिव? मंत्री? राज्यमंत्री? कोण सिद्ध करणार आहे? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य करणार आहात. काही तरी गांभीर्य ठेवा. तरीही म्हणता याच्यावर संयुक्त चिकित्सा समिती बसवायची नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

तसंच, पुढे मुनगंटीवार म्हणाले, यात तर अलैंगिक संबंध असाही उल्लेख केला आहे. या अलैंगिक संबंधाची कुणी अजून परिभाषा सांगितली नाही. म्हणजे एखाद्या जनावरासोबत तुम्ही अलैंगिक संबंध ठेवला तर तो सदस्य होणार. म्हणजे ते जनावर सर्टिफाईड करून देणार आहे का यांनी माझ्याशी संबंध ठेवला म्हणून? असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -