घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना धमकी देण्याचं सत्र...

Maharashtra Assembly Winter Session 2021: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना धमकी देण्याचं सत्र सुरू – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

महाराष्ट्र विधानसभा आणि या सभागृहाची रचाना बघितली. तर एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे या सभागृहातील सर्वाचं संरक्षण महत्त्वाचं आहे. ही जबाबदारी अध्यक्ष म्हणून आपल्यावर असते. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात धमकीच्या संदर्भात जर प्रश्न उपस्थित होत असला तरी या सभागृहातील किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना धमकी देण्याचं सत्र हे सुरू झालंय. पण दुर्दैवाने ज्या पोलीस विभागावर आपण १५ हजार कोटी खर्च करतो. त्या पोलीस विभागातून धमक्यांची चौकशी करण्यामध्ये त्यांचं निष्पन्न शून्य होतं. असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

मंत्रालयामध्ये आम्ही २०० कोटी रूपयांचा खर्च करतो

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार सभागृहात म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांना धमकी देणारी व्यक्ती व्हॉट्सअॅपवर अजूनही सापडलेली नाहीये. त्यामुळे पोलीस विभागाचं अभिनंदन करायचं, कौतुक करायचं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा. मंत्रालयामध्ये आम्ही २०० कोटी रूपयांचा खर्च करतो. पण दारूच्या बाटल्या तिथे कोणं घेऊन गेलं. याबाबतीत अद्यापही शोध लागलेला नाही.

- Advertisement -

सरकार बदललं तर मनही बदलतं

मंत्र्यालयाला सुरक्षा देण्यासंदर्भातील मी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे की सुरक्षा द्यायची नाही. सरकार बदललं तर मनही बदलतं. त्यामुळे या विषयाला राजकारणाच्या चौकटीत न बघता या संदर्भात आमदारांची एक विशेष समिती करण्याची आवश्यकता असल्याची मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे.

सुंदर लोकशाही कुरूप करण्याचा प्रयत्न

या समितीने सुंदर लोकशाही कुरूप करण्याचा प्रयत्न होता कामा नये. छगन भुजबळ यांनाही धमकी देण्यात आली होती. परंतु ते राजकीय नेते असल्यामुळे त्याच्यावर कोणीही लक्ष दिलं नाही. मात्र, तरीदेखील सर्वांसाठी एक भिती आहे. त्यामुळे अध्यक्षांनी राज्य सरकारला न विचारता त्यांनीच निर्णय घेणं महत्त्वाचं आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअॅपवर आलेल्या धमकीचा जर आम्ही शोध लावू शकत नाही. तर देश कसा सुरक्षित राहील. हा प्रश्न आदित्य ठाकरेच्या धमकिचा नसून ही धमकी आमच्यासमोर गुंड आणि बदमाश लोकांनी आम्हाला एक आव्हान दिलं आहे. हे आव्हान महाराष्ट्राच्या भुमीला आहे. परंतु हे आव्हान आपण स्वीकारले पाहीजेत, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: मृतांच्या वारसाला नोकरी देण्यास सकारात्मक – अनिल परब


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -