घरमहाराष्ट्रऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून; मुख्यमंत्र्यांची मान्यता, यंदा लाखो टन साखर उत्पादनाचा अंदाज

ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून; मुख्यमंत्र्यांची मान्यता, यंदा लाखो टन साखर उत्पादनाचा अंदाज

Subscribe

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मुंबई : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून 88.58 लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. (Sugarcane sieving season from November 1 The Chief Ministers approval the production of lakhs of tons of sugar is estimated this year)

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले.

- Advertisement -

हेही वाचा : PHOTOS : बांगलादेशाचे भारताला विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य

साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल

गेल्या वर्षी राज्यात 211 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून 105 लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन 88.58 लाख मेट्रीक टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला. हंगाम 2022-23 मध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ उत्तरप्रदेश राज्याचा क्रमांक आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘वेगळे झालो म्हणून काय झाले, मैत्री कायम राहणार’; भाजपबद्दल INDIA आघाडीतील नत्याचे वक्तव्य!

कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा

ऊसतोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून 10 रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय झाला. या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतीगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी एफआरपी बाबत समग्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -