घरमहाराष्ट्रबेस्टच्या जुन्या बसगाड्यांचा वापर आर्ट गॅलरी, वाचनालये, रेस्टॉरंटसाठी करा; केसरकरांचे पालिकेला निर्देश

बेस्टच्या जुन्या बसगाड्यांचा वापर आर्ट गॅलरी, वाचनालये, रेस्टॉरंटसाठी करा; केसरकरांचे पालिकेला निर्देश

Subscribe

मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी, बुधवारी (18 ऑक्टोबर) मुंबई महापालिका मुख्यालयात जनता दरबार आयोजित करून संवाद साधला.

मुंबई : बेस्टच्या जुन्या बसगाड्या भंगारात अथवा निकाली काढण्याऐवजी त्यांची आवश्यक ती दुरुस्ती कामे करून त्या बसगाड्या काहीशा नीटनेटक्या करून त्यांचा उपयोग काही ठिकाणी आर्ट गॅलरी, वाचनालये आणि रेस्टॉरंट यासाठी करण्यात यावा, असे निर्देश मुंबई जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.(Use BESTs old buses for art galleries libraries restaurants Kesarkars instructions to the municipality)

मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी, बुधवारी (18 ऑक्टोबर) मुंबई महापालिका मुख्यालयात जनता दरबार आयोजित करून संवाद साधला. यावेळी, नागरिकांकडून प्राप्त 17 विविध प्रकारच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश केसरकर यांनी प्रशासनाला दिले. तसेच, बेस्टच्या मुदतबाह्य ठरणाऱ्या बसगाड्या भंगारात न काढता त्यांचा सुयोग्य वापर करण्याचे निर्देशही पालकमंत्री केसरकर यांनी दिले. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

- Advertisement -

हेही वाचा : ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून; मुख्यमंत्र्यांची मान्यता, यंदा लाखो टन साखर उत्पादनाचा अंदाज

मध्यान्ह भोजनात भाजीपाल्याचा योग्यप्रकारे वापर करा

महापालिकेच्या शाळांमध्ये किचन गार्डन सुरू करा आणि मध्यान्ह भोजनात भाजीपाल्याचा योग्यप्रकारे वापर करण्यात यावा, असे निर्देशही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तसेच, पालिका शाळांच्या इमारतींचे सुशोभीकरण करणे, शाळेतील ग्रंथालयांमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर आदी प्रेरणादायी व्यक्तींची आत्मचरित्रं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राची निर्मिती करणेबाबत पालकमंत्री यांनी प्रशासनाला निर्देश दिले. त्याचप्रमाणे, पेन्शन, रोजगार, मलबार हिल जलाशय, इमारतींचा पुनर्विकास, विकासकांकडून सुविधांची अपूर्तता आदी विषयांबाबत नागरिकांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे काही समस्या मांडल्या. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : “बारामतीत माझ्याविरोधात कोणीही लढणार…”, सुप्रिया सुळेंची सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर प्रतिक्रिया

लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’

महालक्ष्मी मंदिर परिसर विकास, बेगर होमबद्दलचे धोरण व व्यवस्था करणे, रात्र निवासबाबत नियोजन करणे, वाहनतळ आरक्षण, वाहतुकीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे, विद्यमान उद्याने व क्रीडांगण, आरक्षणाचा विकास करणे, झोपडपट्टी वसाहतीत शौचालयांची पुनर्बांधणी करणे, महिलांसाठी पिंक टॉयलेट उभारणे, ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ची निर्मिती करणे आदी कामांचा आढावा पालकमंत्री केसरकर यांनी घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -