घरमहाराष्ट्रपत्रकार बाळ बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट

पत्रकार बाळ बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट

Subscribe

पोलीस अधीक्षकांची माहिती, २० पर्यंत पोलीस कोठडी

संगमनेर – सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने रविवारी (दि.१४) २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, बोठे याला हैदराबादमध्ये अटक केल्यानंतर अंगझडतीत त्याच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली. गेल्या तीन महिन्यांपासून बोठे हा पोलिसांना चकमा देत होता.

सुसाईड केल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना संपर्क करा, असा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये असल्याचे पाटील यांनी सांगितले. फरार असल्याच्या कालावधीत बोठेला कुणी मदत केली, तसेच जरे यांच्या हत्येची सुपारी त्याने का दिली, सुपारी किती रुपयांची होती इ. बाबींचा उलगडा अद्याप बाकी असल्याने सरकारी वकील सिद्धार्थ बागले यांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. बोठे याच्या वतीने मंगेश तवले यांनी युक्तिवाद केला. बोठे याची पत्नी आणि दोन्ही मुले सकाळपासून पारनेरमध्ये उपस्थित होते, तर जरे यांचा मुलगा रुणाल हादेखील वकिलांमार्फत न्यायालयात उपस्थित होता.

- Advertisement -

दरम्यान, बोठे याला मदत करणाऱ्या आंध्र प्रदेशमधील वकील जनार्दन चंद्रप्पा, राजशेखर चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ आणि महेश वसंतराव तनपुरे (नगर) यांनादेखील अटक करण्यात आली आहे. तर, पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (हैदराबाद) ही महिला आरोपी फरार आहे. दरम्यान, बोटे यांच्या संपर्कातील अनेकांचे धाबे आता दणाणले आहे.

बेड्या घालून आणले न्यायालयात

बोठे याला नगरमध्ये आणल्यानंतर व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोप माध्यमांनी व जरे यांच्या मुलाने केला होता. त्याला एका फॉर्च्युनर वाहनातून पारनेरमध्ये आणण्यात आले होते. यासंदर्भात अधीक्षकांनी खुलासा केला. परराज्यातून आणण्यासाठी काळजी घेतली. मात्र, पोलिस ठाण्यात त्याची बडदास्त ठेवली गेली नाही. चौकशीचा भाग म्हणून त्याला स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले होते व न्यायालयाची परवानगी घेऊनच आज त्याच्या हातात बेड्या घालण्यात आल्या, असेही त्यांनी सांगितले. हातात बेड्या घालून बोठेला न्यायालयापर्यंत चालत आणण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -