घरमहाराष्ट्रAjit Pawar VS Rohit Pawar : रोहित पवारांना अजित पवारांचे दादा स्टाईल...

Ajit Pawar VS Rohit Pawar : रोहित पवारांना अजित पवारांचे दादा स्टाईल प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील नामांकन अर्ज भरण्याची उद्या, बुधवारी शेवटची तारीख आहे. असे असतानाही महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपाने सर्व सूत्रे स्वत:च्या हाती ठेवली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारशा जागा दिल्या जात नसल्याचे सांगण्यात येते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते. मात्र आता अजित पवार यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांना “दादा” स्टाईल प्रत्युत्तर दिले आहे. (Ajit Pawar VS Rohit Pawar Ajit Pawars Dada style reply to Rohit Pawar)

हेही वाचा – Baraskar Vs Jarange : जरांगेचे उपोषण सोडणाऱ्या महिलेकडे नवी कोरी गाडी कशी आली? बारसकरांचा सवाल

- Advertisement -

आज पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, लोकसभेच्या जागावाटपात आम्हाला केवळ तीन जागा मिळाल्या, असा गैरसमज काहीजणांकडून पसरवला जात आहे. आम्ही जास्त जागांची मागणी केली होती. परंतु, यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे 23 आणि शिंदे गटाचे 18 खासदार निवडून आले आहेत. या सर्व जागांवर आम्हाला पुन्हा उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मर्यादित जागा आल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला योग्य तितक्या जागा मिळण्यासाठी दोन्ही मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीमधील जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील, हे यादी जाहीर झाल्यानंतरच समजेल, असा टोला अजित पवार यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला आहे.

हेही वाचा – Raghuram Rajan : 2047 पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय मूर्खपणाचे; राजन स्पष्टच म्हणाले

- Advertisement -

काय म्हणाले रोहित पवार? 

रोहित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत ट्वीट करताना म्हटले होते की, एरवी रुबाबदारपणे तिकिटे वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढे करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटे पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे, असे रोहित पवार यांनी अजित पवार यांचे प्रत्यक्ष नाव न घेता म्हटले होते. तसेच एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचे वाटते की, एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जात आहे. आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करतील, असे सांगत रोहित पवार यांनी भाजपावरही निशाणा साधला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -