घरताज्या घडामोडीमाझी स्वत:ची मालमत्ता ४ कोटींची, काय हडप केलं त्याचा रेकॉर्ड आहे का?,...

माझी स्वत:ची मालमत्ता ४ कोटींची, काय हडप केलं त्याचा रेकॉर्ड आहे का?, सुरेश धस यांचा मलिकांना सवाल

Subscribe

एक हजार कोटी हे आकडे सांगत आहेत. तर माझ्या स्वत:ची प्रॉपर्टी चार कोटींची आहे. माझी सर्व प्रॉपर्टी नवाब मलिक यांना देऊन टाकतो. म्हणजे माझ्यावरील कर्ज आहेत ते तरी फिटेल. १ हजार कोटी आणि ईडीच्या प्रकरणात आम्हाला कशाला ओढत आहेत. कोणीतरी माहिती देत आहे आणि त्यावरती राज्याच्या मंत्रिमंडळातील एका जबाबदार मंत्र्याने बोलावं. यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.

यापूर्वी देखील नवाब मलिक यांनी जी वक्तव्यं केलेली आहेत. त्यासाठी त्यांना माफी मागावी लागली आहे. कोणाच्यातरी तरी सांगण्यावरून अशा प्रकारचे आरोप करणं अत्यंत दुर्दैवं आहे. ३०० एकर जमिनी हडपल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. परंतु त्यांच्याकडे पुरावे कुठे आहेत. त्यांनी जे हडप वैगेरे या शब्दांचा वापर केला आहे. त्यासाठी काही मर्यादा पाहीजे. कालपर्यंत ते माझं नाव घेत नव्हते. परंतु आता त्यांनी माझं नाव घेतलं आहे. मात्र, त्यांच्याकडे काहीच पुरावे नसल्यामुळे मला त्यांच्यावर अब्रनुकसानीचा दावा करावा लागेल. असे सुरेश धस म्हणाले.

- Advertisement -

नवाब मलिकांचा भाजप आमदारवर आरोप

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सुरेश धस यांच्यावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी एकूण १० धार्मिक स्थळांच्या जमिनीचा घोटाळा आरोप केला होता. याप्रकरणाची गृहमंत्र्यांनी दखल घेऊन एसआयटी स्थापन केली आणि २ एफआयआर दाखल केले. यात मच्छिंद्र मल्टीस्टेटचा समावेश आहे. याप्रकरणात भाजपचे सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर आमदार सुरेश धस यांनी प्रत्त्यूत्तर दिलं आहे.

दुसऱ्याच्या सांगण्यावरून मंत्र्याने आरोप करणं हे चुकीचं

भाजप आमदार सुरेश धस यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर देत सांगितलं की, कोण शेळके? कोण अगाव? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत व्यवस्थित माहिती न घेता विनाकारण दुसऱ्याच्या सांगण्यावरून मंत्र्याने आरोप करणं हे चुकीचं आहे. तसेच आरटीआय टाकणारं बोलणं त्यांचं ठिक आहे. परंतु नवाब मलिक बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. असं सुरेश धस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणे ही फसवणूक नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाकडून तरुणाची निर्दोष सुटका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -