घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहारेलच्या सर्वेक्षणाला ब्रेक, दोन गावांत रखडले काम

महारेलच्या सर्वेक्षणाला ब्रेक, दोन गावांत रखडले काम

Subscribe

बालाजी देवस्थानच्या प्रश्नावरून मंत्रालयातील महसूल विभागाच्या सुनावणीचे भिजत घोंगडे

पुणे-नाशिक शहरांना सेमी हायस्पीड रेल्वेने जोडणारा अत्यंत महत्त्वाचा महारेल प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असले, तरी विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली शिवारातील शेतीच्या उतार्‍यावरील बालाजी देवस्थानचे नाव कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागात सुनावणी झाली. मात्र, अद्याप कोणताही निर्णय न प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. या तीन गावांपैकी विहितगाव व बेलतगव्हाण या गावांतून जाणार्‍या महारेल प्रकल्पाचे काम शेतकर्‍यांनी थांबवल्याने सर्वेक्षण काम रखडले आहे.

नाशिक तालुक्यातील विहितगाव (२९१), बेलतगव्हाण (२११) व मनोली (२१४) या गावांतील ५१६ हेक्टर जमिनीवर बालाजी देवस्थानचे नाव लागलेले आहे. देवस्थानचे नाव कमी करण्यासठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकदा प्रयत्न केले. मंत्रालयात खा. हेमंत गोडसे, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार योगेश घोलप आदींच्या माध्यमातून या विषयावर अनेक बैठका झालेल्या आहेत. हा प्रश्न सुटण्यापूर्वीच विहितगाव व बेलतगव्हाणच्या याच जमिनींतून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची घोषणा होऊन सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. या वेळी खासदार गोडसे व महारेलचे अधिकारी यांनी गावोगाव बैठका घेऊन लोकांच्या शंका दूर करत आश्वासने दिली. जमिनींना समृद्धी महामार्गात बाधितांना मिळालेल्या मोबदल्या प्रमाणेच पाच पट रक्कम देण्याची शेतक-यांची मागणी आहे. महारेलच्या पुणे ते नाशिक दरम्यान होत असलेल्या महारेल प्रकल्पामुळे बाधित शेतकर्‍यांना मोबदला मिळणार आहे, मात्र, या दोन गावांतील असंख्य शेतकर्‍यांच्या जमिनीच्या उतार्‍यावर बालाजी देवस्थानचे नाव आहे.

- Advertisement -

या प्रकल्पातून मिळणार्‍या मोबदल्यावर शेतकरी व देवस्थान यांनी हक्क सांगितल्याने काम थांबवण्यात आले आहे. बालाजी देवस्थान असलेले बेलतगव्हाणचे २९१ हेक्टर क्षेत्र व विहितगावचे २११ हेक्टर क्षेत्र बाधीत होत असलेल्या शेतकर्‍यांचा प्रश्न मंत्रालयातील महसूलमंत्री कोकण विभागात ८ जुलै २०२१ या गावांची प्रत्येकी एक सूनावणी झाली. पुढील सुनावणी लवकर होण्यासाठी शेतकर्‍यांच्या वतीने खा. गोडसे व आ. आहिरेंकडे मागणी केली जात आहे.

रेल्वे मार्गाचे काम सुरु झालेले आहे. मात्र, या गावांतील बालाजी देवस्थानच्या प्रश्नामुळे काम शेतकर्‍यांनी थांबवलेले आहे. न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत काम थांबवण्यात आल्याचा लोकप्रतिनिधी समक्ष शेतकर्‍यांनी निर्णय घेण्यात आलेला आहे. लवकर प्रश्न मार्गी लागावा. – सुनील धुर्जड, माजी सरपंच, बेलतगव्हाण

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -