घरमहाराष्ट्रखाकीतला पिस्तूलासह व्हिडिओ स्टंट भोवला,पोलीस शिपाई महेश काळेचं निलंबन

खाकीतला पिस्तूलासह व्हिडिओ स्टंट भोवला,पोलीस शिपाई महेश काळेचं निलंबन

Subscribe

सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात अमरावतीमधील पोलीस शिपाई महेश काळे याला चांगलेच भोवले आहे.

सोशल मीडियावर सध्या टिक-टॉक बॅन झाल्यानंतर इंस्टाग्राम रिल्स हा एक नविन प्रकार नेटकऱ्यांच्या भेटीस आला. काही सेंदाच्या व्हिडिओद्वारे अनेक लोकं सोशल मीडियावर ट्रेंड  होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रेंड झालात तर कोणताही व्यक्ती रातोरात स्टार होतो असे विचार आता नेटकरी करु लागले आहेत. पण इंटरनेटवर व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी हितकारक ठरेल असे नाही. सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात अमरावतीमधील पोलीस शिपाई महेश काळे याला चांगलेच भोवले आहे. खाकीचा रोब झाडत हातात पिस्तूल धरुन महेश काळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. अल्पवधीतच तो व्हिडिओ व्हायरल झाल्याने महेश काळे यांना आता व्हिडिओ तयार करणे  महागात पडलं आहे. पोलिस शिपाई महेश काळे यांनी व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडियावर अकाऊटंवर पोस्ट केला होता. व्हिडिओ व्हायरल होताच अमरावतीमधील पोलिस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांनी ताबडतोब  कारवाई करत शासकीय गणवेशाचा चुकीचा वापर केल्याने महेश काळे यांना निलंबित केलं आहे. बेजबाबदार व चुकीच्या वागणुकीमुळे महेश काळे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर महेश काळे यांनी सोशल मीडियावरुन हा वादग्रस्त व्हिडिओ डिलीट केला आहे. काही  सेकेंदाच्या  व्हिडिओमुळे महेश काळे यांना चांगलाच फटका बसल्याचे दिसतेय.सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे अनेकांवर चुकीचा परिणाम होतो. तसेच पोलिसाच्या गणवेशाचा मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याने लोकांमध्ये अश्या चुकीच्या व्हिडिओमुळे अयोग्य संदेश जाता कामा नये. यामुळे आता महेश काळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय म्हंटलय-

- Advertisement -

‘अमरावती जिल्ह्यात प्रवेश करताना दादागिरी आणि भाईगिरी दहा किलोमीटर लांबच ठेवून यायचं भाऊ.. अमरावतीत जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार.. कारण कसंय ना कायद्याचा बालेकिल्ला, ओन्ली अमरावती जिल्हा..’ असं या व्हिडीओत म्हटलं आहे. अशा डायलॉगसह हातात पिस्तुल आणि खाकी गणवेशात महेश काळे यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता.


हे हि वाचा – मुंबईत छोटा शकील, ठाण्यात रवी पुजारी परमबीर सिंह गुन्ह्यात अंडरवर्ल्ड कनेक्शन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -