घरभक्तीगुढी पाडवा का साजरा केला जातो?

गुढी पाडवा का साजरा केला जातो?

Subscribe

हिंदू संस्कृतीनुसार चैत्र शु्द्ध प्रतिपदेला गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो. यावर्षी २ एप्रिल २०२२ ला गुढी पाडवा आहे. मराठी वर्षाची सुरुवात या दिवसाने होते. यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारल्या जातात. काठीला रेशमाचे वस्त्र गुंडाळून त्यावर धातुचा तांब्या उपडा ठेवून त्याला कडुनिंबाचा पाला, आंब्याची पाने, फुलांचा हार बांधला जातो. साखरेच्या गाठी गुढीवर वाहतात. घरात गोडाधोडाचा नेवैद्य बनवतात. देवाला नैवेद्य अर्पण करून नववर्ष सुख समृद्दीचे जावो अशी प्रार्थना केली जाते. हिंदू संस्कृतीतील साडेतीन शुभ मूर्हुतांपैकी एक मुहूर्त गुढीपाडवा देखील आहे.

पौराणिक कथांनुसार प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रम्हा यांनी विश्वनिर्मिती केली होती. यामुळे या दिवशी ब्रम्हदेवाची विधीवत पूजा केली जाते. तसेच भगवान राम १४ वर्षाच्या वनवास पूर्ण करून अयोध्येत परतले होते. त्यांचे स्वागत गुढी उभारून करण्यात आले होते. असेही पुराणात सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, गुढीला ब्रम्हध्वज असेही मानले जाते. यामुळे यादिवशी गुढीची पूजा केल्याने वाईट गोष्टींचा अंत होतो, घरातील नकारात्मक उर्जेचा नाश होतो. घरात सुख समृद्धी नांदते अशी धारणा आहे. महाराष्ट्रासह, गोवा, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, काश्मीर आणि देशातील इतर राज्यातही गुढी पाडवा साजरा केला जातो.या दिवशी विशेष करून पुरण पोळी श्रीखंडाचे जेवण केले जातात. सूर्योद्यावेळी भगवान विष्णू आणि ब्रम्हाला नैवेद्य दाखवला जातो.

पुराणानुसार गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रम्हाने विश्वनिर्मिती

- Advertisement -

गुढीची पूजा कशी करावी?

गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योद्यापूर्वी उठावे.

सुंगधीत तेल उटणे लावून स्नान करावे

घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या डहाळी, फुलापानांचे तोरण लावावे

गुढीची पूजा करावी.

नंतर विष्णू देवताची पूजा करावी

गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -