घरमहाराष्ट्रआंगडिया प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

आंगडिया प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Subscribe

मुंबई – आंगडिया खंडणी वसुली प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आयकर विभागाची भीती दाखवून आंगडिया व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. ते गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होते.

त्यामुळे त्यांच्या वकिलामार्फत अटकपूर्वी जामीनाचा अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार आहेत. गृह विभागाने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर, त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. बुधवारी हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे सौरभ यांच्या अटकेची टांगती तलवार आहे.

- Advertisement -

एल.टी.मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याची तक्रार आंगडीयांच्या संघटनेने केली होती. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही तक्रार करण्यात आली होती. पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात बोलावून पैसे उकळत असल्याचा आरोप त्रिपाठींविरोधात करण्यात आला होता. त्यामुळे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत त्रिपाठी आयकर विभागाची भीता दाखवून आंगडीया यांच्याकडून पैसे उकळत असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -