घरमहाराष्ट्रकरोना साथ नियंत्रण कक्ष आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या नियंत्रणात

करोना साथ नियंत्रण कक्ष आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या नियंत्रणात

Subscribe

राज्यात करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून, या करोनाचा मुकाबला करण्यासाठी मंत्रालयात करोना साथ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता.हा कक्ष मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय बुधवारी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

करोना विषाणूचा मुकाबला व आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील दालन क्रमांक ६०३मध्ये करोना साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. करोनामुळे राज्यातील अत्यावश्यक सेवा, आर्थिक, उद्योग, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच बाबींच्या संदर्भात राज्यस्तरावर संनियंत्रण करण्यासाठी मंत्रालयातील राज्यस्तरीय करोना कक्ष मुख्यमंत्री यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येत असून, हा कक्ष यापुढे मुख्यमंत्री कार्यालयाचा अभिवाज्य घटक राहिल, असे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -